नवीन लेखन...

आजीवन साहचर्य म्हणजे विवाह

आजकालचे नाते-संबंध अत्यंत वाईट अवस्थेतून जात आहेत. यातून घटस्फोटाला प्रोत्साहन मिळत आहे. यासाठी प्रामुख्याने व्यभिचार, सुसंवादाचा अभाव, अवास्तवी अपेक्षा, समानतेचा अभाव, कौटुंबिक हिंसा, आर्थिक समस्या, राग, संताप, भावनिक जवळीकतेचे अभाव इत्यादी गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. याव्यतिरिक्त मानसिक आजार आणि हिंसक प्रवृत्ती घटस्फोटासाठी प्रवृत्त करते. […]

वैशालीतला उपमा आणि सुदाम्याचे पोहे

शनिवारवाडा, सिंहगड, म्हात्रे पूल, बिडकरची मिसळ या प्रमाणेच वैशाली हे पुणेकरांचे एक अत्यंत आदरांचे स्थान आहे. वैशालीतला उपमा खात आणि फर्ग्युसन वर नजर ठेवीत कित्येकांनी तारुण्यात बहार आणली. अशांनी वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे स्वाभाविक आहे पण एका तीन वर्षाच्या मुलाने वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे जरा जास्तच होते. […]

अहिल्योध्दार : गोमंतकीय रंगभूमीचा पाया

गोव्यात गावागावात जेवढी म्हणून देवस्थाने आहेत, तेवढाच नाट्यमंडळांचाही आकडा आहे. गोव्यातील नाट्यपरंपरा कधीपासून सुरू झाली, याला अनेकांचे दुमत आहे. परंतु “अहिल्योध्दार” नाटकाच्या मूळप्रतीवरून एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच गोमंतकीय रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली असावी असे अनेक जाणकारांचे मत. गोव्याचे संतकवी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकर लिखित “अहिल्योध्दार” या नाटकाच्या प्रतीवरून आणि त्यांंच्या इतर लिखाणावरून जाणकारांनी कृष्ण जगन्नाथ […]

दी ग्रेट इंडियन लोकशाही सर्कस

जुन्या काळी मनोरंजनाचे सर्कस हे एक आकर्षण होते. पण काळाबरोबर सर्कस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पण लोकशाहीच्या कृपेने भारतीयांकरता ही सुविधा निवडणूकीच्या रुपाने आजही उपलब्ध आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणविणार्‍या लोकशाहीतील निवडणूका या सर्कसपेक्षा जरा जास्तच मनोरंजक तर असतात. रिंगमास्टर हा दिल्लीत बसून ह्या सर्कसची सूत्रे हालवित असतो. याच्या एका इशार्‍यावर बंडोबा थंड होतात. गुरगुरणारे […]

मन एक पाखरू

मन …….मन ही खूप कोमल भावना आहे ,जी प्रत्येकाच्या अंतःकरणात वसलेली आहे.मन हे भणभंनाऱ्या वाऱ्यासारखे , असंख्य प्रश्नासारखे,सागराच्या उफनत्या लाटांप्रमाणे उठणार्‍या भावना लहरी…… मन कधी अनेक समस्यांचे तुफान….. […]

भक्ती

माझी एक “मैत्रिणी” होती रांगेत माझ्यापुढे काही अंतरावर. एक माणूस कुणीतरी येऊन तिच्याशी काही बोलला आणी ती निघुन .गेली. अर्ध्या तासानं ती नामदेवाच्या पायरीकडून परत जाताना दिसली.. बहुधा संध्याकाळीचं तिच फ्री बुकिंग झालं होतं .तिचं. आणि दर्शनही. […]

बाव (विहीर)

आमच्या गावात विहीरीला बाव असे म्हणतात. कदाचित बावडी शब्दापासून बाव बोलले जात असावे. मी विहीरीवर जाऊन येतो असं बोलण्यापेक्षा मी बावीवर जाऊन येतो असे बोलले जाते. आमची बाव नेमकी कधी बांधली ते माहीत नाही पण बाबा सांगतात त्या प्रमाणे सुमारे 55 ते 60 वर्षांपूर्वी आमच्या आजोबांनी बावीच्या तळाशी असलेला कातळ सुरुंग स्फोटांनी उडवून खोली वाढवली आणि पक्कं बांधकाम करवून घेतलं होते. […]

पुण्यातील संगीत महोत्सव

गणपती, दसरा- दिवाळी या सणासुदीच्या दिवसांनंतर पुण्यात संगीताचे वेगवेगळे महोत्सव एकानंतर एक चालु असतात. सवाईगंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, स्वरगंधार आणि शेवटी वसंतोत्सव. सवाईच्या सीझन तिकीटसाठी आतुन फिल्डिंग लावल्यास लाईनमधे उभे राहण व निराशा टाळता येउ शकते, स्वर गंधारमधे स्टुडंट डिस्काउंट असते तर वसंतोत्सव चक्क फ्रीच असतो. तिन्ही कार्यक्रमांसाठी खचाखच गर्दी होत असते. झुंडीने होणार्या ह्या गर्दीत दर्दी आणि “बेदर्दी” दोन्ही गटांचे सभासद आढळतात. […]

भय इथले संपत नाही…

तिन्हीसांजेला मन असंच खूप हळवं झालं ….पार दूर दक्षिणेला … समुद्र किनाऱ्यावर जावंसं वाटायला लागलं …. बारदेशात …. खरं तर अति प्रबळ इच्छा झाली … इतकी की वाऱ्याच्या वेगाने धावत जावं … पण वास्तवातलं जग तेवढं सोपं नाही ना … प्रत्यक्ष जरी जाऊ शकलो नाही तरी मन मात्र शेकडो मैल दूर असलेल्या त्या किनाऱ्यावर गेलंच […]

रिमझिमणारा पाऊस…….

पहिल्या पावसाची सरी धर्तीवर पडावी अन् सबंध आसमंत मातीच्या कस्तुरी गंधात न्हाऊन जावा.पावसाची वाट पाहणाऱ्या चातकाची तुष्णा शांत व्हावी ,उन्हाच्या तापाने सोकलेली झाले पावसाची सरी येताच टवटवीत झालेली ,असा संजीवनी देणारा पाऊस प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा .असा हा बहुरंगी पाऊस सृष्टीला फुलवणारा, लपून बसतो मनाच्या गाभाऱ्यात […]

1 231 232 233 234 235 304
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..