नवीन लेखन...

झाड म्हणालं…

पूर्वी अंगण मोठे असायचे. त्यात मुलांना खेळण्यासाठी जागा असायची. विशेष म्हणजे अंगणभर पुरेल अशी सावली देणारं मोठं झाडही असायचं. आजीच्या संगतीनं नातवंड झाडाखाली बसुन अनेक गोष्टी ऐकत बसायचे. ते बालपण खरच मोठे गमतीशीर आणि नशीबवान होतं.. असो… अंगणातून रस्त्यावर आलेल्या आणि नंतर बोन्साय बनुन घराच्या गॅलरीत आलेल्या झाडाची स्वत:ची एक कहाणी असेल का? असू शकते ना? […]

प्रवास

रविवारी सकाळी उठता उठताच तो तिला म्हणाला, “थोडं भराभर आवरून घेतो, एकाला भेटायला जायचंय.” त्याचा एक जवळचा, नी जूना colleague आहे, लिंगा नावाचा. त्याचे वडील वारलेले ४ दिवसांपूर्वी. आज सुट्टी आहे तर भेटता येईल. काही वर्षांपूर्वी एकदा mild attack आलेला त्यांना, त्यामुळे हे तसं अनापेक्षितच होतं! त्याचे स्वतःचे वडीलही नुकतेच घरी राहून गेलेले, त्यामुळे तोही जरा […]

एक आई

कशी बघतेय ती माझ्याकडे! खरं तर मला कबुतरं अज्जिबात आवडत नाहीत. मुख्य म्हणजे आमच्या सगळ्या building मध्ये जिथे तिथे colonies नी राहून सगळं घाण करुन ठेवलेनीत! पण आत्ता ना, एका कबुतरीने अंडं घातलंय माझ्या balconyतल्या एका कुंडीत! मला घाबरून सकाळी एकदा दूर जाऊन बसलेली, पण सतत डोळा माझ्याकडे! तेव्हा दिसलं, छोटुस्सं अंडं! आता तिला समजलंय कि […]

गाठोड्यातलं सत्य…

ते देखणे मंदिर होतं. सुशोभीत केलेलं… चकचकीत… बऱ्याच जणांची तिथे गर्दी झालेली… कुणाला कशासाठी न्याय हवा होता, कुणाला कशासाठी… कुणावर अत्याचार झाला होता, कुणी अन्यायाची शिकार झालेलं… प्रत्येकाची बाजू वेगवेगळी… न्याय मिळवून घेण्याची प्रत्येकाची घालमेलही वेगवेगळी… सगळेच फिरत होते… कोट घातलेल्या व्यक्तींच्या मागे… इकडून तिकडे… गरजवंताला आणि शोषीतांना काही कळत नाही… सांगतील तसे वाकतात ते… बिचारे. […]

कोरा कागज

कुठेतरी दूर रणरणत्या उन्हाची दुपार असते, ओठ शुष्क करणारे वारे वाहताहेत, मनाला भेदणारा एकाकीपणा आहे… कुठुनतरी सुर कानावर येताहेत… ‘मेरा जीवन कोरा कागज, कोरा ही रह गया…’ किशोरदाचा स्वर हृदयाला भिडणारा. मनातलं कागदावर आणणारे हे जादुई शब्द, पुन्हा मनात घर करून राहतात… राहिले आहेत. अनेक वर्षांपासुन… आदीम अवस्थेत असणाऱ्या माणसाला लिहिण्याची समज आली तशी तो पानांवर […]

कॉमन मॅन

हा कॉमन मॅनच आहे, ज्याच्या जिवावर उभे राहतात इमलेच्या इमले. ज्याच्या जिवावर चालतोय गाडा व्यवस्थेचा, लोकशाहीचा, विश्वासाचा, परंपरेचा अन संस्कृतीचा. तोच सगळं सांभाळतोय हे सारं. सगळे अन्याय अत्याचार सहन करूनही तो मात्र फार आशावादी. त्याला निश्चितपणे वाटतंय हे सारं बदलणार आहे. आज ना उद्या परिस्थिती बदलेल. सारं काही चांगल होईल असे चित्र तो मनाशी रंगवत असतो. […]

काटेपुराण…

जुन्या काळातील चित्रपटात एक सीन हमखास रहायचा, तो म्हणजे नायिका बागेत चालत असते… चालता चालता तिच्या पायात अचानक काटा रुततो… शेजारी असलेला नायक अलगद तिच्या पायातला काटा काढतो… चित्रपट पुढे सरकत जातो. थोडक्यात काय तर चित्रपटात नायक-नायिकेचे प्रेम फुलवायला आणि चित्रपट पुढे सरकवायला काटा कारणीभूत ठरतो, असो… काटा पाहिला नाही, असा माणुस या पृथ्वीवर सापडणे अवघडच. […]

आतल्या आत

खळखळ वाहणारी नदी, तिच्या काठावर असलेला वटवृक्ष. त्याच्या विस्तीर्णपणे पसरलेल्या पारंब्या. पारंब्यातून पुन्हा नव्या वृक्षाची पालवी फुटतेय, असे स्वप्नवत चित्र. फार पुर्वी बघायला मिळत होते. आता तसे राहिले नाही. असेल कुठे एखाद्या गावकुसात. आपल्याला ते माहित नाही इतकेच. आपल्याला खरे तर बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. आपल्याला हे ही माहिती नसतं आपल्याच आत दडलेला वटवृक्ष अन त्याच्या […]

माझा कविता लेखन प्रवास – भाग १

माझा लेखन प्रवास 1983-84 साला पासून सुरु झालेला आहे. सातत्य-सराव- स्वाध्याय ‘ ही लेखनाची त्रि-सुत्री आरंभापासून कायम आहे. आरंभी म्हणजे 1983 ते 1997 अशी 14 वर्ष मी फक्त कथा, लेख, बालकथा असे गद्य लेखन केले. परभणीच्या वास्तव्यात कवी आणि कविता सहवास घडत गेला आणि माझ्यातील कवीला आविष्कृत होण्यास अनुकूल वातावरण मिळाले. […]

मिर्झा गालिब आणि गुलजार यांचा लेख : भाग ३

गुलजार यांचा हा लेख ललित-लेख आहे, असें जर जाहीर केलें गेलें असतें, तर मग त्यांच्या या कल्पनाविष्काराबद्दल कांहीं तक्रार असायचें कारणच नव्हतें. मात्र, तसें न केल्यानें, वास्तविक परिस्थिती काय होती अथवा काय होती-असेल , याचा ऊहापोह करणें क्रमप्राप्त झालें. या मंथनातून, गालिबबद्दल  योग्य ती माहिती सर्वांपर्यंत पोचेल अशी आशा. […]

1 234 235 236 237 238 304
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..