मिर्झा गालिब आणि गुलजार यांचा लेख : भाग २
कॉलेजचे प्रिन्सिपॉल साहेब गालिबच्या शायरीचे चाहते होते, त्यांना गालिबबद्दल, गालिबच्या फारसी भाषेच्या ज्ञानाबद्दल आदर होता. जेव्हां जेव्हां गालिब त्यांना भेटायला जात, तेव्हां प्रिन्सिपॉल साहेब स्वत: बाहेर येऊन गालिबचें स्वागत करीत आणि त्यांना आंत घेऊन जात. म्हणूनच, गालिबच्या दोस्तानें शब्द टाकल्यावर ते प्रिन्सिपॉल गालिब यांना फारसीच्या प्राध्यापकाची नोकरी द्यायला राजी झाले. […]