ललित लेखन
आठवडी बाजार
रत्नागिरी जिल्ह्यातलं राजापूर तालुक्यातलं ताम्हाणे हे आमचं बारा वाड्यांचा छोटस गाव. आमच्या गावाला रोज लवकरच जाग येते तरीही दर बुधवारी आमच्या गावात जरा जास्तच गजबज जाणवायला लागते. हा दिवस असतो आमच्या आठवडी बाजाराचा. आमच्या गावापासून नऊ किलोमीटरवर पाचल नावाच्या गावी हा बाजार दर बुधवारी भरतो. फक्त आमच्याच नाही तर पाचलची पंचवीस किलोमीटरच्या परिसरातील गावांमधून लोक या बाजारासाठी येतात. […]
चित्रपटांवर बोलू काही
एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की प्रेक्षकवर्गांच्या मनामध्ये एकच काहूर माजलेला असतो ते म्हणजे बॉक्स ऑफिसवर किती कमाई झाली. अर्थहीन संहिता, चुकीची मांडणी पद्धत अशा गोष्टींमुळे काही चित्रपट एक आठवडा सुद्धा सिनेगृहात चालत नाहीत. भारतीय संस्कृती, परंपरा, भाषा आणि कलेचे प्रतिनिधित्व करणारे चित्रपट मूळ तत्वांना विसरून विनाशाकडे वाटचाल करीत आहेत.चित्रपट पाहताना काय घ्यावे आणि काय नाही याबद्दल सजग राहणे आमची आणि तुमची जबाबदारी आहे. […]
थोडं गोड, थोडं आणखी गोड
त्यादिवशी संध्याकाळी मी ऑफिसातून जरा तावातावानेच आलो. दिवसभर प्रामाणिकपणे काम करून साला! साहेबाला त्याचं काहीच नाही म्हणजे काय? काल न सांगता रजा घेतली म्हणून टकल्याने अगदी रामादेखत माझी बिनपाण्याने केली. काल एका महत्वाच्या शोधमंडळात आमची नियुक्ती झाली होती हे त्याला सांगून काय उपयोग? […]
कलेचं “राज”कारण !!
….. पण, ‘ठाकरे’ सिनेमाबाबत गेले काही दिवस नेमकं उलट पाहतो आहे. एकाही कार्यक्रमात, मुलाखतीत, बातमीत दिग्दर्शक म्हणून अभिजित पानसेंसाठी काहीच जागा ठेवण्यात आली नाही. बातमीतली जागा तर सोडाच ….नुकताच, ठाकरे सिनेमाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. त्या शोमध्ये त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकालाच योग्य जागा बसण्यासाठी दिली गेली नाही, असं बातम्यांवरून समजलं. […]
माझा मोबाइल डाएट
मोबाइल डायेट हा अत्यंत कठीण प्रकार आहे. मनुष्य अन्नपाण्याविना चार दिवस काढू शकतो पण मोबाइलशिवाय नाही. अचानक मोबाइल बघणे बंद केल्यास वेड लागण्याची शक्यता आहे. अशा शारीरीक आणि मानसिक गरजांचा अभ्यास करुनच हा मोबाइल डायेट प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर हा डायेट करीत आहेत यात काहीही शारीरीक किंवा मानसिक बाधा झाल्यास आम्ही जबाबदार नाही. […]
अपनेपे भरोसा है तो ये दाँव लगा ले
१९४७ साली फाळणी झाली आणि एकसंध असलेल्या हिंदुस्तानाची शकलं झाली.त्यामुळे कित्येक लोक कायमचे पाकिस्तानात गेले व आपलं भाग्य थोर म्हणून सध्या पाकिस्तानात असलेल्या ठिकाणी जन्म घेऊन पण कित्येक कलाकार भारतात येऊन स्थाईक झाले.अशाच एका कलाकाराची ही हकीगत….. […]
आयुष्य – सिनेकलाकारांची सांगड
आपल्यापैकी काही जणांना माझ्यासारखं सिनेमाचं आणि त्यातल्या त्यात संगीतकार , गायक व सिनेकलाकारांचं वेड असतं. आणि कधी कधी ते इतकं असतं की आयुष्याशी पण अशा सिनेकलाकारांची सांगड घातली जाते ! अशीच सांगड घालणारी एक कल्पना मांडली आहे […]