नवीन लेखन...

अपेक्षा तेथे…..

अपेक्षा तेथे परम दुःख म्हणतात. पण नातेसंबंधांच्या बाबतीत अयोग्य अपेक्षा तेथे परम दुःख असा अनुभव येतो. आयुष्यात अनेक व्यक्ती भेटत असतात. प्रत्येक व्यक्ती विषयी आपण आपली एक समजूत करून घेतो. त्या व्यक्तीविषयी आलेल्या अनुभवातून, तिच्या स्वभावाला बघून आणि कधीकधी आपल्या जुन्या अनुभवांतून त्या व्यक्तीविषयी विशिष्ट अशी प्रतिमा पक्की करतो. त्या प्रतिमेच्या चौकटीतून त्या व्यक्तीला कायम बघत असतो. […]

मै अकेलाही मजनू था

“जवा बघाव तवा जुन्याच गप्पा , जुनेच  सिनिमा , जुनीच  गाणे , जुन्याच आठवणी ! तुम्ही नुसती भूत झालात ,भूत ! आजच्या काळात का नाही जगत ? अस काय आहे त्या तुमच्या काळात जे आज आमच्या काळात नाही ?” असा खडा सवाल ,एका सो called ‘तरुणा’ने (जो जेष्ठ नागरिक वाटत असलातरी पन्नाशीच्या आसपास लोंबकळतोय ) ,’ अस काय आहे त्या मोहिनीत  जे माझ्यात नाही !’ या उषा चव्हाणने दादा कोंडकेना विचारलेल्या प्रश्ना प्रमाणे त्याने मला प्रश्न विचारला .  […]

काय म्हणतंय तुमचं ड्रायव्हिंग?

“मग काय म्हणतंय तुमचं ड्रायव्हिंग?” हा प्रश्न विचारून लोक नवशिक्या ड्रायव्हरच्या जखमांवर का मीठ चोळतात कळत नाही. म्हणजे अशा प्रश्नांना काय उत्तर द्यायचे हा एक प्रश्नच असतो. बर्‍याचदा हा प्रश्न निर्मळ मनाने विचारला जातो की उगाचच डिवचायला हे समजणे अवघड असते. बरं ड्रायव्हर लोकांना नवीन गाडी शिकणार्‍याची व्यथा तरी समजते पण ज्याला ड्रायव्हिंगचे ओ का ठो […]

मित्र व मैत्री

मित्र अथवा मैत्री हा शब्द ऊच्चारताच आपल्या नजरेसमोर अनेक मित्र व त्यांची मैत्री ऊभी रहाते. मित्र किंवा मैत्री करताना कधीही ऊच्च निच, जात, धर्म स्त्री पुरुष असा विचार मनात येत नाही. किंबहूना मैत्री केली जाते म्हणण्यापेक्षा मैत्री होते असेच म्हणणे जास्त ऊचीत होईल. […]

ओला कोपरा !

त्या दिवशी माझे भिजलेले अंग , कपडे , डोक कोरड झालाय. पण सगळ नसलं तरी मनाचा एक कोपरा अजून ओलाच आहे ! तो क्षण ,तोच पाऊस , तोच मी ,तीच उषा परत येणार नाही . मला माहित आहे . तरी ओला जीव कोठेतरी गुंतलाच आहे ! […]

व्यायाम केलाच पाहिजे का?

‘आरोग्यम् धनसंपदा-’ या उक्तीचा साक्षात्कार झाला की मी व्यायाम चालू करतो आणि ते वेळापत्रक दोन दिवसात कोलमडते. एरव्ही व्यायामाची मला आवड आहे अशातला भाग नाही. कोणतरी हार्टफेलने गेला किंवा कुणाचे बीपी वाढलेले कानावर आले की मी नेमाने व्यायाम सुरू करतो. आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवायचेच म्हणून आपोआप आतून स्फुरण येते, पण ते फारच कमी टिकते. […]

एक आठवण – शांतिनिकेतनची

मी 1977 ला  इस्टर्न कोलफिल्डस् लि. या कंपनीत  नोकरी करण्यासाठी  राणीगंज जवळच्या  परसिआ  या  खाणीत 18.1.1977 ला  जॉईन झालो.तो  दिवस मला  महत्वाचा  वाटला  होता ,माझ्याकरता.कारण एक चांगली वरचे पैसे  कमवू देऊ शकणारी  पीडब्ल्यूडी ची तीन वर्षांची महाराष्ट्रातील नोकरी  सोडून मी  इतक्या  दूर बंगालमध्यें आलो होतो. […]

पासपोर्ट : एक सुखद अनुभव

माझा पासपोर्ट अप्लाय केल्यापासून तिसर्‍या दिवशी तो घरात आला आणि माझ्या डोक्यातल्या सरकारी यंत्रणेला छेद बसला. थोडक्यात म्हणजे गोगलगायच्या गतीने काम करणार्‍या गवरमेंटवरचा विश्वास उडाला. लोकांच्या कामाच्या बाबतीत अतिदक्ष असणारे आपले सरकार एवढे कार्यक्षम झाले असेल ही स्वप्नातदेखील कल्पना नव्हती. मी साध्या पासपोर्टबद्दल बोलतोय. तात्काल नव्हे. जिथे तात्काल पासपोर्ट यायला आठ दिवस लागतात तिथे साधारण पासपोर्ट […]

बायको नावाचे अजब रसायन

“घरची थोडी तरी कामे करत जा. हॉटेलवर आल्यासारखे घरी येता आणि सकाळी उठल्या उठल्या आॅफिसला जाता!” मला खात्री आहे, बर्‍याच नवरेमंडळीना हे वाक्य थोडयाफार दिवसांनी ऐकायला लागतेच. […]

एक पाऊल ओल्या वाळूंत – भाग ४

“पुढे काय झालं?” सुरेशने अधीरतेने विचारलं. “हो रे, सांगते नां !” लककीने सुरुवात केली. “याच सुमाराला पप्पांच्या एका नातेवाईकाने डाव साधला. रमेश कामत असं त्याचं नांव. त्याचाही हॉटेल व्यवसाय होता. माझ्या आईशी लग्न व्हावे अशी त्याची इच्छा होती, म्हणजे त्याकाळी त्याला भरपूर हुंडा मिळाला असता, शिवाय आजोबांची इस्टेट. पण दामू आज्जांनी मम्मीकरतां पप्पांची निवड केली हे […]

1 244 245 246 247 248 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..