एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार इमारत
७ जुलै २०१७ रोजी भारतातल्या सिनेतंत्राच्या शोला १२१ वर्षे पूर्ण झाली आणि या खेळाचे साक्षीदार… […]
७ जुलै २०१७ रोजी भारतातल्या सिनेतंत्राच्या शोला १२१ वर्षे पूर्ण झाली आणि या खेळाचे साक्षीदार… […]
‘तुम्ही का लिहिता’ हा प्रश्न मला अनेकजण विचारत असतात. मलाही हा प्रश्न बऱ्याचदा पडतो. इतरांना पटो वा न पटो, पण याचं साधं सोपं उत्तर आहे. ते म्हणजे, मला लिहायला आवडतं, हे. परंतू हे एवढंच नाही. तर माझ्याकडे सांगण्यासारखं जे आहे किंवा मला जे प्रश्न पडतात, ते मला कागदावर (आता स्क्रिनवर) मांडायला (आता टायपायला) आवडतं, असा त्याचा पुढचा भाग आहे. […]
आपण सगळेच स्वत:शीच आयुष्यभर Hide & Seek चा गमतीशीर खेळ खेळत असतो. कालानुरूप वा व्यक्तिनिहाय त्या खेळाचे स्वरूप बदलत असले तरी त्या खेळाचा आत्मा मात्र आयुष्यभर आपल्यातला माणूस शेवटपर्यंत जागा ठेवत असतो. […]
भारतीय संगीतातील कलासंगीत या अत्यंत महत्वाच्या कोटीत रागसंगीताचा समावेश होतो. रागसंगीताचा इतिहास किंवा उगमस्थान शोधणे जवळपास अशक्य स्वरूपाचे जरी असले तरी पारंपरिक मौखिक शिक्षण पद्धतीने अनेक रंग बादलीत आजच्या टप्प्यावर रागसंगीत येऊन पोहोचले आहे. […]
….. तोपर्यंत दक्षिण आफ्रिका म्हणजे नेल्सन मंडेला ही व्यक्ती तसेच, जोहान्सबर्ग, प्रिटोरिया, डर्बन आणि केप टाउन या शहरांची नावे, इतपतच माहिती होती. माझी नोकरी पिटरमेरीट्झबर्ग शहरात होती. हे शहर कुठे आहे, याबाबत संपूर्ण अनभिज्ञ होतो. […]
महाभारत सर्व भारतीयांच्या मनात आदर व विशेषतः हिंदू धर्मीयांच्या भाव भावनांचे प्रतीक. महाभारत किंवा त्यातील विविध पात्रे माहीत नाहीत अशी व्यक्ती सापडणे हे अत्यंत दुर्मिळ. मानवी जिवनातील भावभावनांचे प्रतिबींब आपणास यात पहायला मिळते. माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरणारे काम, क्रोध, लोभ,मोह,मद, मत्सर हे षड्रिपू जर कुठे एकत्रीत पहायचे असतील तर तुम्ही फक्त महाभारत अभ्यासा तुम्हाला ते पावलोपावली […]
काही अतिरेकी भक्तलोक देव, देवी किंवा महाराजांचे उगाचच धमकीवाले मेसेज पाठवतात. नुसते पाठवत असतील पाठवू देत बिचारे! त्याचे काही नाही. पण त्यांनी पाठवलेल्या मेसेजची लिंक तोडायची नसते. मेसेज पुढे पाठवला नाही तर फार मोठे नुकसान होणार अशी वर धमकी असते. […]
अपेक्षा तेथे परम दुःख म्हणतात. पण नातेसंबंधांच्या बाबतीत अयोग्य अपेक्षा तेथे परम दुःख असा अनुभव येतो. आयुष्यात अनेक व्यक्ती भेटत असतात. प्रत्येक व्यक्ती विषयी आपण आपली एक समजूत करून घेतो. त्या व्यक्तीविषयी आलेल्या अनुभवातून, तिच्या स्वभावाला बघून आणि कधीकधी आपल्या जुन्या अनुभवांतून त्या व्यक्तीविषयी विशिष्ट अशी प्रतिमा पक्की करतो. त्या प्रतिमेच्या चौकटीतून त्या व्यक्तीला कायम बघत असतो. […]
“जवा बघाव तवा जुन्याच गप्पा , जुनेच सिनिमा , जुनीच गाणे , जुन्याच आठवणी ! तुम्ही नुसती भूत झालात ,भूत ! आजच्या काळात का नाही जगत ? अस काय आहे त्या तुमच्या काळात जे आज आमच्या काळात नाही ?” असा खडा सवाल ,एका सो called ‘तरुणा’ने (जो जेष्ठ नागरिक वाटत असलातरी पन्नाशीच्या आसपास लोंबकळतोय ) ,’ अस काय आहे त्या मोहिनीत जे माझ्यात नाही !’ या उषा चव्हाणने दादा कोंडकेना विचारलेल्या प्रश्ना प्रमाणे त्याने मला प्रश्न विचारला . […]
“मग काय म्हणतंय तुमचं ड्रायव्हिंग?” हा प्रश्न विचारून लोक नवशिक्या ड्रायव्हरच्या जखमांवर का मीठ चोळतात कळत नाही. म्हणजे अशा प्रश्नांना काय उत्तर द्यायचे हा एक प्रश्नच असतो. बर्याचदा हा प्रश्न निर्मळ मनाने विचारला जातो की उगाचच डिवचायला हे समजणे अवघड असते. बरं ड्रायव्हर लोकांना नवीन गाडी शिकणार्याची व्यथा तरी समजते पण ज्याला ड्रायव्हिंगचे ओ का ठो […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions