नवीन लेखन...

‘रोगा’यण !!

खूप दिवसा पासून ,म्हणजे फेसबुक वर ती पोस्ट वाचल्या पासून ,या क्षणाची मी वाट पहात होतो . तो क्षण माझ्या आयुष्यात आलाच ! तसा तो बरेचदा आला आहे .पण आता मला ‘त्या ‘पोस्ट ‘ मुळे नेमकं काय करायचं ते कळलंय ,आणि मी ते करण्याचा निश्चय केला आहे ! […]

संभ्रम

गेल्या आठवड्यापासून पाहते दोन-तीन दिवस दुकानाबाहेर माणसांची ही लांबलचक रांग…एकीला विचारले कसली रांग आहे.. सेल-बिल आहे की काय? तशी म्हणाली.. आहात कुठे तुम्ही..अहो प्लास्टिक बंदी आहे ना…स्टीलच्या वस्तु घेण्यासाठी रांग आहे ही.. आणि माझी ट्यूब पेटली… […]

ज्योतिष शास्त्र – माझा अनुभव

…. त्यानंतर मी ज्योतिष्य शास्त्राचा अभ्यास केला आणि माझा निष्कर्ष असा आहे ज्योतिष्य शास्त्र खरे आहे पण त्याचा आधार घेऊन भविष्य बदलता येत नाही. ज्योतिष्यशास्त्र सुद्धा तुमच्या घडणार असणाऱ्या भविष्यासाठी कारणीभूत असू शकते. […]

कोट

आजकाल लग्ना – कार्यात घालण्याच्या कपड्याचे एक नवच खूळ निघालंय. ‘इथनिक ‘ ड्रेसच ! साधारण संदलच्या उंटाच्या पाठीवर जसा भडक रंगाचा मद्रा
घालतात तसल्या जातिकुळीतल्या कापडाचा लांब बंद गळ्याचा शर्ट (म्हणू का नेहरूशर्ट का कोट माझेच मत पक्के नाही), त्यावर बटबटीत सोनेरी, चंदेरी कशिदाकारी आणि खाली चुडीदार पैजामा. उंच्या पुऱ्या पुरुषांना हा ड्रेस शोभून हि दिसतो. […]

मास्तर, शिक्षक आणि गुरुजी

‘ इतिहासाची पुनरावृत्ती होते ” हे वाक्य वापरण्या इतकाच माझा आणि इतिहासाचा संबंध उरलाय . याला माझ्या पेक्षा माझे शालेय जीवन ,शाळा आणि शिक्षकच ज्यास्त जवाबदार आहेत . ‘इतिहास ‘ तसा रंजक विषय पण आमच्या काळी इतिहासच काय पण समग्र शिक्षणाच्याच सानिध्यात रंजकता येऊ नये अशी ठाम भूमिका सर्वानी घेतली असावी ! युद्ध वर्णना पेक्षा सनावळी आणि तहाची कलमेच ज्यास्त ! या सनावळी आणि तहाच्या कलमानी , आमची या विषयाची आवड ‘कलम ‘ केली ! आम्ही फक्त परीक्षे पुरत्याच आमच्या ‘कलमा ‘ झिजवल्या हे बारीक खरे आहे ! […]

कवी आणि कविता

कविता कशी करतात माहित नाही. पण कविता वाचताना एक अनोखा आनंद होतो. किमान मला तरी होतो. आणि आणखीन एक विचार मनात चमकून जातो.आपण का नाही करू शकत अश्या कविता? यातला प्रत्येक शब्द परिचित आहे ,त्यांचा अर्थ आपण जाणतो .मग मी का नाही करुशकत कविता? सराव नाही म्हणून? सरावाने जमेल? […]

पहिला पाऊस आणि डरांऊ-डरांऊ करणारे बेडूक

काळ बदलला. विकासाचें वारे वाहू लागलें. गल्लीतील घरे ३ माल्याचें झाली. गल्ली हि सिमेंट कांक्रीटची झाली. जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टेंकर सुरु झाले तिथे बागवानी साठी पाणी कुठून येणार. घरा समोरचे वरांडे अदृश्य झाले. प्रत्येक प्लॉट वर १०० टक्के निर्माण. लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. कार आणि AC घरात आले. अदृश्य झाले ते रात किडे, पावसाळी किडे आणि डरांऊ-डरांऊ करणारे बेडूक. […]

उन्हाळी दुपार आणि पित्ज्झा बॉय

अर्ध्या तासात तिन्ही पित्ज्झे डिलिवर करून तो पुन्हा पित्ज्झा शॉपवर येऊन पोहचला. डोक्यावरचे हेल्मेट काढून बाईकच्या आरश्यात स्वत:चा चेहरा बघितला. चेहर्‍यावर अनेक सुरकुत्या पसरलेल्या दिसल्या. पुन्हा विचारचक्र सुरु झाले, हेच काम आणिक काही वर्ष केले, तर आपण लवकर म्हातारे दिसणार. जो पर्यंत दुसरी नौकरी मिळत नाही, हे काम करावेच लागेल. पोटाचा गड्डा भरायला. त्याला वाटले पित्ज्झा डिलिवर करता करता तो हि एक पित्ज्झा झाला आहे…… जंगली श्वापदे त्याचे लचके तोडतात आहे….. […]

काय कुत्रा पाळताय ?

“साहेब तो जवळ येत नाही आणि येऊ पण देत नाही ,आता तुम्हीच प्रयत्न करा .” असे म्हणत त्यांनी ती ‘खाऊ ‘ची पुडी मला दिली . त्यात काय आहे हे सांगायला ज्योतिष्याची गरज नव्हती . मी पुडी उघडली , […]

1 246 247 248 249 250 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..