नवीन लेखन...

निवडणुका आणि प्रसारमाध्यमे

सन २०१९च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा माहौल सुरू झाला आहे. चढत्या क्रमाने त्याची रंगत वाढत जाणार आहे, रंग बदलत जाणार आहेत. भारतीय लोकशाहीसाठी तर निवडणूक हा मोठा सोहळाच. या सोहळ्याचे स्वरूप मात्र खूप झपाट्याने पालटत चालले आहे. […]

जिव्हाळ्याचं बेट

लहानपणी मला तुझ्या आजोळी नातेवाईक किती, असा प्रश्न विचारला की मी लगेच सांगायचे, पाच मामा, पाच मावश्या, मग सगळ्यांची नावं सांगायचे. मावश्यांची नावं सांगताना अक्का, ताई, शकू, शालू आणि जोशी असं सांगायचे. बाकी सगळ्यांची नावं घेऊन मी पुढे मावशी म्हणायचे आणि या मावशीला मात्र जोशी असं आडनाव घेऊन मावशी म्हणायचे. […]

झांझीबारवासियांची लाडली ‘डालाडाला’

जगभरच्या सरकारने प्रवासी-सेवा ताब्यात घेतल्या. मात्र सरकारी व्यवस्थापनातली गलथानता अनुभवल्यावर ओरड सुरू झाली. ‘‘सरकारकडे प्रशासनाचे व कायदा-कानूच्या अंमलबजावणीचे काम करण्याऐवजी बस आणि आगगाड्या चालवायच्या फंदात कशाला पडायचं? खाजगीकरणामुळे सरकारी अंमलाचे घुमजाव युग आले. […]

निसर्ग आणि आपण

संक्रांत होऊन गेली, की हवा गरम होऊ लागते. पहाटे आणि संध्याकाळी येणारे वारे सुखद वाटू लागतात. ‘तहान’ जागी होऊ लागते. या दिवसात मला आठवतं, आम्ही झाडाला मडकी टांगून ठेवत असू. त्या मडक्यात पक्ष्यांना प्यायला पाणी ठेवलं जाई. दिवसभर जाता-येता त्या मडक्यात पाणी आहे ना, हे पाहिलं जाई. झाडावरचे कावळे, चिमण्या ते पाणी पीत आणि तृप्त होऊन उडून जात. […]

स्वामी विवेकानंद- भाग १

आज १२ जानेवारी २०१८. स्वामी विवेकानंदांची १५५ वी जयंती. १२ जानेवारी २०१२ ला त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरू झाले. त्यादिवशी एका कार्यक्रमांत मी वक्ता म्हणून त्यांच्या जीवनावर दीड तास बोललो. ४० मिनिटे बोलायचे होते पण माझे बोलणे पूर्ण होईना. […]

माध्यमांची भाषा

कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात ‘मराठी भाषा दिन’ साजरा होतो. या दिनानिमित्त मराठी भाषेचे वैभव, सौंदर्य, प्राचीन परंपरा, मराठी भाषेची थोरवी आणि मराठी भाषेतील संपन्न साहित्याचा वारसा यावर गोडवे गाणारे लेख प्रसिध्द होतात. व्याख्याने होतात. आम्ही मराठी भाषक आहोत, असेही टाळ्यांच्या गजरात वक्ते सांगतात. […]

वो, फिर नहीं आते

गेल्याच महिन्यात, १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा झाला. त्या दिवशी फेसबुकवर कृपा देशपांडे यांचा ‘टिम टिम करते तारे’ हा लेख वाचनात आला. त्या लेखात त्यांनी डेजी इराणी, हनी इराणी, सचिन, मास्टर महेश, बेबी तबस्सुम, बेबी फरिदा, बेबी नाझ, मास्टर राजू व ज्युनियर मेहमूद अशा हिंदी चित्रपटातील बाल कलाकारांबद्दल लिहिलेलं आहे. […]

संत स्त्रियांचे स्त्री स्वातंत्र्यातील योगदान

 साहित्यिक, सामाजिक आणि पारमार्थिक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये आत्मभान करणाऱ्या संत जागृत ठेवून कार्य कवयित्रींची आठवण आजसुद्धा या गतिमान कालप्रवासात स्त्रियांना मार्गदर्शन – प्रोत्साहन देणारी आहे. इसवी सन बाराव्या शतकाच्या काळात ‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति’ या मनूच्या वचनामुळे स्त्रीला परावलंबी, दुर्बल बनवली होती. बालविवाहामुळे शिक्षण वर्ज्य म्हणजे ज्ञानकवाडेही बंद. […]

चाळीतली दिवाळी

दसरा झाला की वेध लागायचे ते दिवाळीचे.घराची साफसफाई तर दसर्‍यालाच झालेली आसायची,घर कसल ते दहाबाय दहाची खोलीच ती,वर एक पोटमाळा त्यातच आईने जुन्या कपडयांच बोचक,ताईच्या लग्नात आलेली आहेराची भांडी,वापरात न आलेल सामान अस बरचस काहीबाही सामान कस नीट लावून ठेवलेल आसायच. […]

दूरदर्शन

टेलिव्हिजनचा शोध जरी १९३० च्या सुमारास लागला होता तरी भारतात टेलिव्हिजन यायला १९५९ साल उजाडावे लागले. दिल्लीत भरलेल्या जागतिक तंत्रज्ञानाच्या प्रदर्शनीत एका युरोपियन कंपनीने सर्वप्रथम भारताला टेलिव्हिजन दाखवला. प्रदर्शनानंतर तो टीव्ही संच आपल्याला भेट म्हणून दिला. […]

1 23 24 25 26 27 296
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..