आपली प्रमाण भाषा मराठी आहे. तशी ती महाराष्ट्रातल्या सर्वच बोलींची प्रमाण भाषा मराठी आहे. व्यवहारासाठी एक भाषा असणं सोयीचं असतं म्हणून प्रमाण भाषेचं महत्व. अन्यथा त्या त्या भागातील. सर्वसामान्य लोकांचा विचार विनिमय स्थानिक लोकभाषेतच होत असतो. तद्वत, सिंधुदुर्गात मराठी जरी व्यवहाराची भाषा असली, तरी लोकव्यवहाराची भाषा मालवणी आहे. आपण मराठी ही आपली मातृभाषा आहे असं म्हणत असलो, तरी आपली खरी मातृभाषा ‘मालवणी’ आहे. मराठी आणि मालवणीतला फरक नेमका सांगायचा तर सहावारी साडी आणि नऊवारी साडडी येवढाच सांगता येईल. नऊवारी नेसणाऱ्या आपल्या मालवणी आईने, मराठीची सहावारी साडी नेसावी, इतकाच फरक या दोन भाषांमधे आहे.. […]