पाकिजा – हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दंतकथा
कमाल अमरोही- मीनाकुमारी यांचा पाकिजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दंतकथा. आणि त्यातील सारी गाणीही. खरंतर एका पातळीवर हा संपूर्ण चित्रपटच एक भव्य- करुण काव्य आहे. […]
कमाल अमरोही- मीनाकुमारी यांचा पाकिजा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दंतकथा. आणि त्यातील सारी गाणीही. खरंतर एका पातळीवर हा संपूर्ण चित्रपटच एक भव्य- करुण काव्य आहे. […]
मामांच्या कार्यालयात त्यांचाच भाचा कामाला होता. दूरचे नाते असले तरी कामात मात्र दोघांचे सगळेच पटायचे. कामाचा, कर्जाचा व मंदीचा व्याप वाढत असल्यामुळे तणाव, चिडचिड आणि वैताग हे रोजचेच झालेले. मामांना परिस्थिती सोसेनाशी झालेली. ‘ऑफिसमध्ये त्रास आहेच आणि घरीदेखील शांतता नाही,’ असे पुटपुटत मामा निघाले. संध्याकाळी घरी जायची वेळ होती. भाचाही घरी जाण्याच्या तयारीत होता. दोघे एकदमच […]
‘प्रेम’ या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे.. त्याचा हेतू हि फार उदात्तह.. प्रेमाची व्याख्या करून त्याला शब्दात सामविणे जवळजवळ अशक्यच, एव्हढी त्याची व्याप्ती आहे. प्रेम केवळ जोडीदारांमध्ये असते असे नाही तर समाजाच्या, कुटुंबाच्या प्रत्येक घटकावर आपल्याला प्रेम करता येते… ते कुठेही आणि कसही करता येत. प्रेमभावना काय असते याचे सुरेख वर्णन मंगेश पाडगावकरांनी केलं आहे. […]
तबला हे खरेच एक तालेवार प्रकरण असते . हे महाराज कधी खाली भुईवर बसत नाहीत . याना स्वतंत्र बैठक लागते ! तबल्याला आणि डग्ग्याला वेगवेगळी ! गिटारी सारखे हे गळ्यात पडत नाहीत कि लाडे – लाडे त्या गिटारी सारखे खांद्यावर चढत नाहीत , कि ‘माऊथ ऑर्गन ‘सारखा मुका घेत नाहीत ! तबला म्हणजे एकदम खानदानी काम हो ! […]
‘लोकसत्ते’मुळे लागलेली वाचनाच्या गोडीला ‘चांदोबा’ने खतपाणी घातलं. वाचावं कसं, ते मला चांदोबाने शिकवलं. चांदोबाने माझं भावविश्व समृद्ध केलं. ….चांदोबातून ओळखीच्या झालेल्या रामायण, महाभारत, शिवलिलामृत, वेताळ पंचविशीतील कथा पुढे थोड्याशा मोठ्या वयात संपूर्ण वाचून काढल्या, त्या याच पद्धतीेने. कळत फार नव्हतंच, परंतू त्यातलं नाट्य मात्र मोहवत होतं. […]
अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे या स्थानाला आशीर्वाद मिळाले नि स्थानाची जागृतता वाढून भरभराट झाली. तो एकूणच इतिहास मोठा रंजक आहे. […]
अरुणाचल प्रदेशात समुद्र सपाटीपासुन साडे तेरा हजार फुट उंचावर असणाऱ्या शिवस्मारक आणि छत्रपती शिवाजी मार्ग याची कथा… […]
गझल हे काव्य खरे, पण ते गेय काव्य आहे. त्यामुळे, रसिकांनी गझल-गान ऐकावे, गझल स्वतः गावी किंवा गुणगुणावी, आणि वाचून रसास्वाद घेतांना सुद्धा ‘ध्वन्य’ पद्धतीने वाचावी, म्हणजे गझलचा आनंद द्विगुणित होईल. […]
यावेळी बऱ्याच वर्षांनी गोव्याला कुटुंबासहीत पर्यटनासाठी जाणं झालं. बऱ्याच म्हणजे जवळपास २२ वर्षांनी. तसं दरम्यानच्या काळात मी एकटा गोव्याला बऱ्याचदा गेलोय, पण ते हवाईअड्ड्यावर आगमन-प्रस्थान येवढ्याच कारणांस्तव. सुशेगाद असा आता प्रथमच गेलो. माझा काॅलेजचा मित्र श्री. दत्ता पाटील गेलं पाव शतक गोव्यात स्थायिक आहे. दत्ता एका बड्या आंतरराष्ट्रीय चेन रिसाॅर्टचा बराच बडा अधिकारी आहे. त्याच्याकडे मागे […]
डॉ.अनिरुद्ध जोशी ते परमपूज्य बापू हा प्रवास एक विलक्षण दैवयोग आहे आणि असा सगळ्याच व्यक्तींच्या नशिबी येत नसतो त्यासाठी काहीतरी पूर्व पुण्याई किंवा नियंत्याची योजना असतेचं. त्यांचे लाघवी व्यक्तिमत्व, मर्यादा राखणारा स्वभाव, करारी बाणा, जनमानसावर आईसारखे निर्व्याज प्रेम करण्याची सवय, दुसऱ्याला मदतीला प्रथम धावून जाण्याचे संस्कार, जाती, धर्म, पंथ, लिंग यात त्यांनी कधीच भेदाभेद केला नाही हे सर्व लेखांतून वेळोवेळी प्रगट होतांना दिसते आणि आता परमपूज्य सदगुरु श्री. अनिरुद्ध बापू झाल्यावरही अजून ते सर्वांना आपले श्रद्धावानमित्र व आप्त मानतात. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions