नवीन लेखन...

तबला आणि मी

तबला हे खरेच एक तालेवार प्रकरण असते . हे महाराज कधी खाली भुईवर बसत नाहीत . याना स्वतंत्र बैठक लागते ! तबल्याला आणि डग्ग्याला वेगवेगळी ! गिटारी सारखे हे गळ्यात पडत नाहीत कि लाडे – लाडे त्या गिटारी सारखे खांद्यावर चढत नाहीत , कि ‘माऊथ ऑर्गन ‘सारखा मुका घेत नाहीत ! तबला म्हणजे एकदम खानदानी काम हो ! […]

शब्दांची पालखी – भाग दोन

‘लोकसत्ते’मुळे लागलेली वाचनाच्या गोडीला ‘चांदोबा’ने खतपाणी घातलं. वाचावं कसं, ते मला चांदोबाने शिकवलं. चांदोबाने माझं भावविश्व समृद्ध केलं. ….चांदोबातून ओळखीच्या झालेल्या रामायण, महाभारत, शिवलिलामृत, वेताळ पंचविशीतील कथा पुढे थोड्याशा मोठ्या वयात संपूर्ण वाचून काढल्या, त्या याच पद्धतीेने. कळत फार नव्हतंच, परंतू त्यातलं नाट्य मात्र मोहवत होतं. […]

श्री सिद्धिविनायक मुळ रहस्य व श्रीस्वामी समर्थांचा संबंध

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे या स्थानाला आशीर्वाद मिळाले नि स्थानाची जागृतता वाढून भरभराट झाली. तो एकूणच इतिहास मोठा रंजक आहे. […]

गझलचा आस्‍वाद कसा घ्यावा

गझल हे काव्‍य खरे, पण ते गेय काव्‍य आहे. त्‍यामुळे, रसिकांनी गझल-गान ऐकावे, गझल स्‍वतः गावी किंवा गुणगुणावी, आणि वाचून रसास्‍वाद घेतांना सुद्धा ‘ध्‍वन्‍य’ पद्धतीने वाचावी, म्‍हणजे गझलचा आनंद द्विगुणित होईल. […]

मी अनुभवलेला गोवा..

यावेळी बऱ्याच वर्षांनी गोव्याला कुटुंबासहीत पर्यटनासाठी जाणं झालं. बऱ्याच म्हणजे जवळपास २२ वर्षांनी. तसं दरम्यानच्या काळात मी एकटा गोव्याला बऱ्याचदा गेलोय, पण ते हवाईअड्ड्यावर आगमन-प्रस्थान येवढ्याच कारणांस्तव. सुशेगाद असा आता प्रथमच गेलो. माझा काॅलेजचा मित्र श्री. दत्ता पाटील गेलं पाव शतक गोव्यात स्थायिक आहे. दत्ता एका बड्या आंतरराष्ट्रीय चेन रिसाॅर्टचा बराच बडा अधिकारी आहे. त्याच्याकडे मागे […]

बहुआयामी व्यक्तिमत्व – डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी

डॉ.अनिरुद्ध जोशी ते परमपूज्य बापू हा प्रवास एक विलक्षण दैवयोग आहे आणि असा सगळ्याच व्यक्तींच्या नशिबी येत नसतो त्यासाठी काहीतरी पूर्व पुण्याई किंवा नियंत्याची योजना असतेचं. त्यांचे लाघवी व्यक्तिमत्व, मर्यादा राखणारा स्वभाव, करारी बाणा, जनमानसावर आईसारखे निर्व्याज प्रेम करण्याची सवय, दुसऱ्याला मदतीला प्रथम धावून जाण्याचे संस्कार, जाती, धर्म, पंथ, लिंग यात त्यांनी कधीच भेदाभेद केला नाही हे सर्व लेखांतून वेळोवेळी प्रगट होतांना दिसते आणि आता परमपूज्य सदगुरु श्री. अनिरुद्ध बापू झाल्यावरही अजून ते सर्वांना आपले श्रद्धावानमित्र व आप्त मानतात. […]

शब्दांची पालखी – भाग एक

मला अगदी मी वाचायला शिकलो, त्या वेळेपासूनच वाचायची आवड लागली होती. तेंव्हा परिस्थिती यथातथाच. आमचीच नव्हे, तर बहुतेक सर्वच कुटूंब गरीब म्हणता येतील अशीच. वाचायची आवड शाळेच्या पुस्तकांवर भागवायची कारण इतर पुस्तकं मिळणं अशक्यच होतं. संस्कृतीत सण ही एकच गोष्ट असायची, वाचन वैगेरेही संस्कृतीचा भाग आहे, हे कुणाच्या गांवीही नसायचं. पुस्तकं सोडा, रोजचा पेपर मिळणंही दुरापास्त असायचं. पेपर न घेणं यासाठी, परवडत नाही हे एकच कारण असायचं. […]

प्रतिक्रया : (१) सरस्वती-सिंधु संस्कृती; (२) सिकंदर व चंद्रगुप्त; (३) आर्य व द्रविड

नुकतेंच, लोकसत्ता, मुंबई आवृत्तीमध्ये, ‘जे आले ते रमले’ हें सुनीत पोतनीस यांचें सदर सुरूं झालें आहे. या सदरात वर्षभर बरेच उपयुक्त व इंटरेस्टिंग मटीरियल वाचायला मिळेल अशी आशा आहे. परंतु, या सदरात आत्तांपर्यंत जो मजकूर आलेला आहे, त्याबद्दल कांहीं ‘जास्तीची’ (additional) माहिती पुढें ठेवणें मला आवश्यक वाटतें, म्हणून ही प्रतिक्रिया. […]

रामायणातील कांहीं स्त्रिया : थोडें विवेचन

सीता ते कैकेयी, शूर्पणखा ते मंदोदरी, अहिल्या ते तारा, सार्‍या स्त्रियांची स्थिती समाजात कुठेतरी ‘खालची’ असलेली दिसते. या लेखात, त्यांच्या एकूण-आयुष्याचें या बाबतीतील अल्प-विवेचन आहे. […]

1 251 252 253 254 255 304
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..