समय है ‘युग’परिवर्तन का
शेवटी युग पाठक यांना अटक झाली. त्यांना पश्चाताप होत असावा, असं ते स्वत:हूनच पोलीसांसमोर हजर झाले त्यावरून वाटतं. श्री. युग पाठक यांना फारशी शिक्षा होऊ नये असं मला मनापासून वाटतं. कारण, पश्चाताप होणं हेच सर्वात मोठं प्रायश्चित आहे, असं आपलं अध्यात्मही सांगतं. श्री. युगजी पाठक गेले सततचे ९ दिवस या पश्चातााच्या आगीत होरपळले आहेत, येवढी शिक्षा त्यांना पुरेशी आहे. ‘शरण आलेल्याला मोठ्या मनाने माफ करावं’ हे ही भारतीय तत्वज्ञानाशी सुसंगतच आहे..! ’युग’परिवर्तन म्हणतात, ते बहुदा हेच असावं..!! […]