बगळा या कादंबरीची निर्मिती प्रक्रिया
‘बगळा’ मी आधी जे लिहिलं होतं जितकं लिहलं होतं ते सगळं रोमन मराठीतून. वाचताना कधी कधी माझं मलाच ते आप लिखे खुदा पढे सारखं व्हायचं . ते तसं बाड टाईप करायला सुद्धा कुणी घेत नव्हतं. मग आम्ही ते टाईप करण्यासाठी सोपं व्हावं म्हणून स्वतः हातानी लिहायचं ठरवलं. आणि महेशने ते मुद्धाम मला तसं सांगितलं की कुणी करण्यापेक्षा तूच कर. मग हातानी लिहीत असताना बऱ्याच वेळेला त्यात सुधारणा होत गेली. काही नवं सुचलेलं टाकता आलं आणि जुनं आता जून वाटत होतं ते माझं मलाच उडवता आलं. थोडक्यात साधारण महिनाभर चाललेलं हे काम आमच्या पथ्यावर पडलं. […]