पंढरीच्या वाटेवर
महाराष्ट्राला वारकरी सांप्रदाय ही खूप मोठी अध्यात्मिक देणगी लाभलेली आहे.त्यातील वारी हा अविभाज्य भाग. दर आषाढ- कार्तिक महिन्यात असंख्य दिंड्या निघतात. पताका खांद्यावर घेऊन , टाळ आणि मृदंगाच्या गजरात ह्या दिंड्या पंढरीकडे आगेकुच करतात. हरिनामाचा घोष होतो. उत्साही वातावरण असते. मजूर, शेतकरी, व्यावसायिक सर्वच स्तरातील माणसं वारीत सहभागी होतात.आनंदाचे डोही, आनंद तरंग ची अनुभुति घेत.मुलांसाठी हा […]