नवीन लेखन...

समाजव्रत

‘सत्यनारायणाचं व्रत’ हा अनेकांच्या भक्तिभावाचा विषय तर अनेकांच्या चेष्टेचा. देवधर्म, सणवार या गोष्टींतील निरर्थक रूढींकडेच ज्यांचं लक्ष जातं, त्यांच्या दृष्टीनं हा चेष्टेचाच विषय. पण अध्यात्माच्या गूढ चर्चेत रमणाऱ्यांच्या दृष्टीनेही हे ‘काम्य व्रत ! ‘ म्हणजे कमी महत्त्वाचंच एकदा कशावरून तरी विषय निघाला आणि मी म्हटलं, ‘काही गोष्टी खरंच कळत नाहीत हं. ‘ […]

माझा वाढदिवस

आज मी ७८ वर्षांचा झालो. म्हणजे ७९वे वर्ष सुरू झालं. ज्येष्ठ की वृध्द की जरठ म्हणायचं स्वतःला? पूर्वी म्हातारा पाहिला की शारदा नाटकांतल पद आठवायचं! ‘म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान.’ त्यांत दिलेला सर्व विनोदी तपशील नाही तरी कांही वर्णन तर आता या वयात लागू पडतंच. […]

पुस्तक मिटून ठेव

पुण्याच्या बुधवारपेठेतील भिडे वाड्यात १८४८ मध्ये जोतिराव फुले यांनी मुलींची शाळा उघडली, स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढणारे ते पहिले भारतीय, त्या काळात पुण्यातला एक एक सनातनी ब्राह्मण म्हणजे ‘आरडीक्स पेक्षा महाभयंकर होता. सनातनी खवळले. […]

बहुचर्चित अमेरिकन ऑपेरा गायिका मारिया कलास

अमेरिकेच्या ऑपेराविश्वात मारिया कलासचे नाव गायिका म्हणून श्रेष्ठ प्रतीचे मानले जाते. त्याचप्रमाणे तिचे व्यक्तिमत्त्वही बहुचर्चित आणि वादळी स्वरूपाचे ठरले होते. कलावंताचा भणंगपणा आणि भावनांची तीव्रता तिच्या स्वभावात होती. रागालोभावर ती ताबा ठेवू शकली नाही. […]

काय ब्वॉ?

‘नग’ म्हणजे ‘पोचलेला’ इसम किंवा ‘कॅरेक्टर’ किंवा ‘पात्र’ आणि कोकणची माणसं कितीही साधीभोळी असली आणि काळजात त्यांच्या भरली शहाळी वगैरे असली तरी एकेक जण म्हणजे ‘नग’ असतो. […]

अमृतमय चंद्रमा

पावसाळा नुकता संपलेला. चार महिने अधूनमधून ढगाआड जाणारा चंद्रमा अश्विनातल्या पौर्णिमेला पूर्ण तेजानं उजळून आलेला. या पौर्णिमेचं स्वतःचं खास स्थान आहे. ही ‘कोजागिरी पौर्णिमा’ । रसिकांना कवींना, लक्ष्मीच्या पूजकांना आणि वैद्यांनाही महत्त्वाची वाटते. […]

समाजमाध्यमांचा विधायक वापर

या सगळ्यात आपल्या भावना आणि विचार एकमेकांशी संभाषण साधून व्यक्त करण्याचे वरदान मानवाला लाभले आहे. पूर्वीच्या काळापासून आपण संदेशवहनासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करीत आलो आहोत या मागे एकच उद्दिष्ट की, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणे तसेच आपले विचार मांडणे. अगदी पूर्वीच्या काळी जलद गतीने संदेश पाठवण्यासाठी तार यंत्रणा अस्तित्वात होती. तसेच पोस्टमनद्वारे येणाऱ्या आपल्या मित्रांच्या-नातेवाईकांच्या पत्राची अनामिक ओढ होती. […]

परदेशीय मराठी कुटुंबातली गृहस्वामिनी

आई बाबा इतके खूष असतात कारण लेकीला परदेशातल्या सुखवस्तु कुटुंबातलं स्थळ मिळतं. आणि  ती ? ती हर्षभराने आकाशाला केव्हाच स्पर्शून येते. धाकटी सोनाली आठवडाभर घरभर नाचत असते, होणार्‍या जिजाजींचे बहारदार वर्णन असलेलं जणू एकच गाणं तिला पाठ येत असतं […]

मराठी मराठी असा घोष कंठी

27 फेब्रुवारीला ‘मराठी भाषा दिन‘ असतो. त्या निमित्ताने समस्त मराठी जनांना मराठीचा पुळका येत असतो. कार्यक्रमांची तर रेलचेलच असते. पण ‘बहुत राजकीय धुमाळी जाहली ऐजी जे‘ अशा बातम्याही 28 तारखेच्या पेपरांमधून वाचायला मिळतात. […]

अमेरिकेतील कामगार चळवळीतील क्रांतिकारक ऐतिहासिक नेतृत्व मदर जोन्स

अमेरिकेतील अत्यंत धोकादायक भयंकर स्त्री’ असे अमेरिकेतील भांडवलदार आणि कारखानदार यांनी जिचे वर्णन केले आहे, ती मदर जोन्स इ.स. १८३० मध्ये आयर्लंडमध्ये मेरी हॅरिस हे नाव घेऊन जन्माला आली होती. आयर्लंडच्या मातीत आणि पाण्यातच क्रांतिकारकांचे पोषण करण्याचे गुणधर्म असावेत! मेरी हॅरिस जोन्सच्या रक्तातच देशप्रेम, त्यागीवृत्ती, अन्यायाविरुद्धची बंडखोरी आणि बेडर क्रांतिकारक वृत्ती होती. […]

1 24 25 26 27 28 301
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..