नवीन लेखन...

दो घडी वो जो पास आ बैठे…

“चार दिवस आधी राहायला येशील ना ग?” माझ्या जवळ जवळ बाराव्यांदा विचारल्या गेल्या प्रश्नाला “होय” असे दोन बहिणींकडून ठाम उत्तर मिळाले ,मग माझा जीव भांड्यात पडला.हि भांड्यात पडण्याची आयडिया कुणाची कुणास ठाऊक? आम्ही आपले सासूबाईंची भांडी जीव पडायला वापरतो..एरवी घरात टपरवेअर. .. असो …एकूणच काय माझा जीव नाॅनस्टीक पातेल्यात पडला. दोघी आल्या आणि घराचे लग्न घर […]

‘आई’चा संप..

आता सध्या सुरू असलेला संप. ह्या संपात मुळात शेतकरी किती आणि राजकारणी किती हा संशोधनाचा विषय आहे. पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे ‘शेतकरी आई’ कष्टाने कमावलेलं लेकरांच्या, झालंच तर घरच्या कुत्र्या-मांजरांच्या घशात घालते, पण असं माज आल्यासारखं रस्त्यावर कधीही फेकून देत नाही. आज रस्त्यावर फेकलं गेलेलं अन्न व दुध खऱे शेतकरी बाजारात विकायला निघाले होते व काही झुंडशहांनी […]

शिक्षणाच्या आयचा घो..!!

दि. ३० मेला १२वी एचएससी बोर्डाचा निकाल लागला. त्या अगोदर काही दिवस आयसीएसई बोर्डाचा निर्णय आला व त्याही अगोदर काही दिवस सीबीएसई बोर्डाचा रिझल्ट लागला. एकाच १२वीचे तिन तिन वेगळे रिझल्ट तिन वेगवेगळ्या दिवशी लागले. ‘बोर्डों के विविधता मे एकता’ ही घोषणा भारताच्या विविधतेच्या तालावर बोलण्याचे माझ्या कंठापर्यत येते पण मी ही राष्ट्रप्रेमाची उबळ मोठ्या कष्टाने […]

लज्जा..

लाजेची कल्पना कालसापेक्ष असते. म्हणजे वेगवेगळ्या काळात ती वेगवेगळी असते. अजंठा-वेरूळ अथवा खजुराहो येथील शिल्प पाहीली असता, शिल्पातील स्त्रीया बऱ्याचश्या नग्न अथवा अर्ध-नग्नानस्थेत दिसतात. ‘टाॅपलेस’ असणं किंवा उरोभाग अनावृत्त असणं ही त्यातील बहुसंख्य शिल्पांत समानता आहे. कोणत्याही काळातली समाजाचे प्रतिबिंब त्या त्या काळातील लेखन-चित्र-शिल्पकलेत लख्खपणे पडलेलं दिसतं. कलाकार समाजातूनच येत असल्याने त्या त्या काळातील प्रचलित इष्ट-अनिष्ट […]

कुंकू..

लेखाचं शीर्षक कुंकू असलं तरी मला त्यात कुकवापासून टिकली, बिंदी, टिका, मळवट वैगेरे कुंकवाच्या सर्व प्राचिन-अर्वाचिन पिढ्या अपेक्षित आहेत. लिहीताना मी फक्त ‘कुंकू’ असाच उल्लेख करणार आहे. आणखी एक, या लेखात फक्त’ हिन्दू स्त्री’च्या कपाळावर त्या मोठ्या अभिमानानं धारण करत असलेल्या ‘सिंदूरी सुरज’ बद्दलच बोलायचंय, पुरूषांच्या कपाळाबद्दल नाही. एक हिन्दू धर्म सोडला तर स्त्रीयांनी कपाळावर काहीही […]

जंगल आणि आपण..

आता उरलेल्या संध्याकाळच्या वेळात जंगलाच्या कडेकडेने सफारी केली. जंगलातला हा संध्या समयच असा असतो, की मनात येईल तो प्राणी तिथे प्रत्यक्षात नसला तरी आपोआप दिसू लागतो. म्हणाल तो प्राणी इथं दिसू लागतो. माझ्या एका सहकाऱ्याला तर संध्यासमयात काळसर दिसणारं हिमालयन पांढरं अस्वल दिसल्याचं त्याने शपथेवर सांगीतलं, जो त्याच्या शेजारी असलेल्या मला हिरवट रंगाचा गणवेष घातलेला फारेश्टचा […]

आजचा तानसेन, फरिश्ता, शापित गंधर्व….

अमृतसरच्या एका गावातून रोज एक फकीर गाणी म्हणत जायचा आणि त्याच्या मागे मागे एक चिमुरडा फकीरच्या पाठोपाठ तीच गाणी म्हणत त्याचा पाठलाग करायचा. फकीर कुठे आराम करण्यासाठी थांबला तर त्या वेळात त्या गाण्यांचा सराव हा चिमुरडा करायचा, हे अगदी रोज घडायचं. एक दिवस या छोट्या मुलाला ती गाणी म्हणताना त्या फकिराने ऐकलं, त्याला कडेवर उचलून घेत […]

प्रवास; एक समृद्ध करणारा अनुभव..

सकाळचा उत्तराखंडातल्या नैनीताल जिल्ह्यातील रामनगर ते जुनी दिल्ली असा प्रवास, ‘रामनगर -दिल्ली संपर्क क्रांती लिंक एक्सप्रेस’ अशा त्या रेल्वेसारख्याच लांबलचक नांवाच्या रेल्वे गाडीनं केला. उत्तर प्रदेश-बिहारकडच्या रेल्वेप्रवासातील गर्दीच्या काही फिल्म्स डिस्कव्हरी-नॅशनल जिओग्राफीक चॅनलवर पाहील्या होत्या, त्या प्रत्यक्ष अनुभवल्या. ‘फेव्हीकाॅल’ची ती गाडीला माणसं चिकटलेली प्रसिद्ध निशब्द आणि पकिणामकारक अॅड तिच्या निर्म्यात्याला बहुतेक इथेच सुचली असावी असं मला […]

1 262 263 264 265 266 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..