नवीन लेखन...

माणूस, मरण आणि मसणवटा..

प्रत्येक सजीवाला मृत्यू आहे. जो जन्मतो तो एक दिवस मरतो. माणसाचेही तसेच आहे.तोही मरण पावतो. एकदा शरीरातून प्राण निघून गेला की शरीर निजिर्व होते. मग आप्तस्वकीय दु:ख व्यक्त करतात. रडतात. आक्रोश करतात. त्या व्यक्तीच्या कर्मावर , वयावर या दु:खाची तीव्रता अवलंबून असते. जी व्यक्ती आपल्या जवळ वावरलेली असते.तिचा लळा लागलेला असणे. तिच्या कर्तत्वामुळे अनेकांचे भले झालेले […]

गंगाई..

हरीद्वारला आमचा मुक्काम विष्णू घाटावरील एका लहानश्या आणि बऱ्याश्याही हाॅटेलात आहे. हाॅटेलातील रुमच्या खिडकीतून समोर अव्याहत वाहणाऱ्या गंगेचं सततच दर्शन होतं असतं. वेगानं वाहणारी गंगा, तिचा वाहताना होणारा आवाज, दिवसाच्या वेळी जाणवत नसला तरी, रात्री दहानंतरच्या निरव शांततेत हा आवाज मंत्रजागरासारखा जाणवतो. किंचित हिरवट झांक असणारं ते पाणी गेली कित्येक शतकं तसंच वाहतं आहे आणि पुढेही […]

जय माॅं गंगे, हर हर गंगे..

आज हरीद्वारला आलो आहे गंगाजींच्या दर्शनाला. हिला गंगा नाही, गंगाजी बोलायचं. खरंच आहे ते, हिन्दू संस्कृतीच्या शेकडो पिढ्यांच्या पोषणकर्तीला अरे-तुरे करून कसं बोलावणार..? पण आपल्या मराठी भाषेत ‘अहो-जाही’ किंवा ‘जी’ वैगेरे बोललं की उगाच अंतर पडल्यासारखं वाटतं. जेवढी व्यक्ती प्रिय, आपली, तेवढी ती अरे-तुरेतली. आईला कुठं आपण अहो म्हणतो? कुठल्या देव-देवीला कुठं अहो-जाहो करतो आपण? आणि […]

इंग्रजी माध्यमातल्या इतिहासाच्या पुस्तकातला तानाजी उर्फ ‘सिंह’

‘विरारच्या नॅशनल शाळेत इयत्ता ४ च्या विद्यार्थ्यांसाठी इतिहासाचे पुस्तका’चं एक पान आज एका ग्रुपवर वाचनात आलं. त्यात तानाजी मालुसरे ह्यांचे टोपण नाव “सिंह” होते असा स्पष्ट उल्लेख आहे. कोंढाण्याच्या लढाईत तानाजी मालुसऱ्यांना वीरमरण आले म्हणून कोंढाण्याचे नाव “सिंहगड” असे ठेवले असा इतिहास असताना, तानाजी मालुसरे ह्यांचे टोपण नाव “सिंह” होते, त्यामुळे कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड ठेवले […]

पुस्तकातून समाधीकडे..

अलीकडे योग, ध्यान (मेडीटेशन, समाधी हो..!) वैगेरे शब्दांची चलती आहे आणि साहजिकच आहे, आणि ज्याची चालती असते त्याच व्यापारीकरण होतेच. त्यामुळे ध्यान, योगचे (‘’योग’साठी आपण ‘योगा’ हा तद्दन चुकीचा शब्द वापरतो. चुकीच इंग्रजी आत्मविश्वासाने शिकवल्याचा आणि शिकल्याचा हा परिणाम. ‘राम’सारख्या देवाचा ‘रामा’गडी या मुळेच झाला. असो, हा विषय वेगळा..!!) काही चलाख लोकांनी व्यापारीकरण केल असल्यास त्यात […]

माझी रीमाताई

ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचा रीमा लागू यांच्याबद्दलचा हा लेख […]

दादर टी. टी. आणि मांजरं

दादरचं खोदादाद सर्कल माहित नाही असा निदान मुंबईत तरी माणूस नाही. महानगरपालिकेच्या दप्तरात व बीईएसटीच्या बसवर जरी ‘खोदादाद सर्कल’ असं नांव असलं तरी हे सर्कल सामान्यजनांत मशहूर आहे ते ‘दादर टी. टी.’ या नांवाने. या नांवातील ‘टी.टी.’चा फुलफाॅर्म ‘ट्राम टर्मिनस’ असा आहे. पूर्वीच्या ट्राम्स इथपर्यंत येऊन, या सर्कलला वळसा घालून पुन्हा कुलाब्याच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघत, […]

टक्कल- केवळ फायदेच, तोटे नाहीतच..

‘पिकलेले केस व उरलेलं टक्कल’ या विषयावर काल लिहीलेल्या लेखात टकलाचे फायदे-तोटे या विषयावर लेखाच्या विस्तारभयास्तव लिहीण्याचं मुद्दामहून टाळलं होतं. ते आता लिहीतो. फायदा दिसल्याशिवाय कोणी कुठेही पुढे जात नाही म्हणून माझ्या दृष्टीनं टकलाचे फायदे काय, ते पहिलं सांगतो. टकलावर तेल लावायची आवश्यकता नसते. लावून उपयेगच नसतो. त्यामुळे तेलाचा व केस नसल्यामुळे केसाला लावायच्या कलपाचाही खर्च […]

टक्कलपुराण – पिकलेले केस व उरलेलं टक्कल

दिल जवाँ हो, तो बेबसी कैसी.. सफेद बालों की, ऐसी की तैसी..!! या ओळी वाचल्या आणि मला केसांवर काहीतरी लिहावं असं वाटू वागलं..केस (अर्थात पुरूषांचे. स्त्रीयांच्या केशसांभारावर ग्रंथच्या ग्रंथ लिहीले गेलेत) शरिराच्या शीर्षभागी असुनही त्यावर फार काही लिहीलं गेलं नसावं असं मला वाटतं. माझे केस लवकर गेले आणि उरलेले त्याही अगोदर पिकले. मी केस रंगवायचा प्रयत्न […]

1 263 264 265 266 267 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..