नवीन लेखन...

बापमाणूस

आयुष्याचा चक्रव्यूह समर्थपणे पेलवणाऱ्या पण काही कारणास्तव असह्य झाल्यामुळं हाताच्या ओंजळीत डोकं लपवून एकटाच ओक्‍साबोक्‍शी रडणारा तो बापमाणूस पाहिला, अन मन हेलावल. काळोखलेल्या आकाशात कडाडणाऱ्या वीजेसारखे विचार एकामागोमाग सुरू झाले …विचारांचं थैमान थांबायला हवं पण विचारांचा प्रवाह मनाच्या खोलवर सैरावैरा फिरत राहिला. पुरुषाच्या सहनशीलतेचा बंध ( काही अपवाद वगळता ) फुटतो आणि तो असहाय होऊन टाहो […]

स्वर्गत – तळकोकणातली सोयरिक

तळकोकणात सोयरिक जुळवणे या प्रक्रीयेला स्वर्गत म्हणतात…. आता याचा स्वर्गाशी काय संबंध तो मात्र माहित नाही… आणी ते पवित्र कार्य, खुप पुण्य वगैरे मिळते म्हणून तसेच मोठेपणाचा सोपा मार्ग म्हणून… या प्रक्रियेत लोक हिरहिरीने भाग घेतात…. पण या अतिऊत्साही मध्यस्थ्यामुळे काहीवेळा मजेदार प्रसंग ऊद्भवतात….. त्यातलाच एक तुम्हाला सांगतो…. काही दिवसापुर्वी आमच्या सौ.व दोन्ही मुलांसोबत सासुरवाडीला जाण्याचा बेत […]

कोलंबस

अमेरिकेचा शोध लावल्यानंतर कोलंबस मायदेशी परतला.राणीनं त्याचं भव्य स्वागत केलं. राजदरबारात त्याच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम आयोजित केला. काही दरबारी कोलंबसचे घोर विरोधक होते. त्यांना अर्थातच हे आवडलं नाही. समारंभ सुरू असताना त्यांच्यापैकी काही म्हणाले, ‘कोलंबसने काही खास कामगिरी बजावलीय असं आम्हाला वाटत नाही. पृथ्वी गोल आहे. कुणीही जरी गेलं असतं तरी त्याला अमेरिका मिळाली असतीच.’ बराच […]

शेवान – प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द

शेवान  – एक प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द….. आज बागेत जात असतांना सहज कापणी झालेल्या भाताच्या शेतात लक्ष गेलं, गाडी तिथेच थांबऊन गेलो तिथे, भाताचे 4. 5 आवे वाफ्याच्या मधोमध ऊभे करून एकत्र बांधलेले…..म्हणजेच शेवान….. कापणी संपल्याची निशाणी…. कापणी संपताना किड मुंग्यांची, पाखरांची काळजी करणारा माझा गरीब शेतकरी… मला अजूनही आठवतय, आजोबा भात शेती करायचे… 7. […]

मिठास जागा, मिठावर जगू नका

श्रीकृष्ण रुक्मिणी एकांतात गप्पा छाटत होते, अचानक रुक्मिणी लाडात येऊन म्हणाली, मी तुम्हाला कशी आहे असे वाटते. श्रीकृष्ण स्मित हास्य करून म्हणाले, रुक्मिणी काय सांगू तुला, तुझे महत्व माझ्यासाठी अनमोल आहे, तू अगदी मिठासारखी आहेस. का………..य, मी मिठासारखी खारट वाटते तुम्हाला, आणि मुसमुसून रडायला सुरवात झाली. श्रीकृष्ण तिला सर्वतोपरी समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण रुक्मिणी काही […]

आज शिखरावर पोहोचायचंच!

“दमलास? चल परत जाऊ. आज इतकं पुरे. पुन्हा कधीतरी जाता येईलच. “”नाही गुरुजी. मी दमलोय; पण आपण इतके वर आलोय, आज शिखरावर पोहोचायचंच! कधी एकदा पोहोचतोय आणि मग तुम्ही ते सत्य सांगताय, असं झालंय मला.” “”माझं वचन नीट आठव. ही मोहीम पुरी होईपर्यंत, जर माझी आज्ञा तू निरपवादपणे पाळलीस, तर ते सत्य सांगेन’ असं म्हणालो होतो […]

सोने आणि वीट (झेन कथा)

एकदा एक तरुण संन्यासी प्रवास करीत असताना, त्याला असाच एक प्रवासासाठी बाहेर पडलेला संन्यासी भेटतो. दोघे एकमेकांना अभिवादन वगैरे करतात आणि पुढचा प्रवास एकत्र करायचा ठरवतात. दुसऱ्या संन्याशाच्या झोळीमध्ये काहीतरी जड वस्तू असते. तो ती झोळी सतत सांभाळतो आहे असे पहिल्या संन्याशाच्या लक्षात येते. रात्री झोपताना सुद्धा तो ती झोळी दूर ठेवायचा नाही. याचे पहिल्या संन्याशाला […]

आजी

आज दिवाळेक ईल्लले मुंबईकार परत तात्याकडे ईले. दिवाळेच्या विषयार चावदिवसाच्या आंघोळीचो विषय ईलो…. आणि तात्याक सांगल्यानी… तात्या तुकाआवस कशी न्हावक घाली ती सांग? तातो म्हणता अरे मी आवस बघुकच नाय… मेली 3 म्हयन्याचो आसताना… आजयेन सांभाळल्यान माका… आता आजी कशी होती? मेल्यानू आवस मी काय बघुक नाय … बापाशीन दुसरा लगीन काय करूक नाय … माका […]

कोणी तरी आहे तिथं

•जगातली कोणतीही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीशी फक्त सहा बिंदूंनी जोडली जाऊ शकते. हे सहा बिंदू व्यक्ती, संस्था वगैरे काहीही असू शकतात. त्याचं म्हणणं होतं, फेसबुक वगैरे माध्यमातनं आपण उगाचच एक बिंदू सहज पुरवतो. हे काहींसाठी फायद्याचं असलं तरी त्याचा मोठय़ा प्रमाणावर गैरवापरही होऊ शकतो. •या समाजमाध्यमांत आपण कसे वागतो, कशाला ‘लाइक’ करतो, कशावर कशी प्रतिक्रिया नोंदवतो याचं […]

पुरणपोळी आणि भैरवी

पुरणपोळी ही भैरवीसारखी आहे. किमानपक्षी सूर नीट लागले तरी भैरवी कमीअधिक रंगतेच. तसंच पुरण छान जमलं की पुरणपोळीची वैगुण्यं क्षम्य आहेत ! पुरणपोळीसाठी केलेले श्रम ही एक संपूर्ण मैफल आहे तर ती खाणे म्हणजे भैरवी आहे. रांधणे हा (जाणकारांसाठीच) आनंद आहे आणि भोजन हा परमानंदाचा कळस आहे. डाळ निवडून घेणे इ. भूप, किंवा बिलावल आहेत. जास्त […]

1 267 268 269 270 271 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..