नवीन लेखन...

अविस्मरणीय गांधीजयंती सप्ताह

आठवणींमध्ये रमण्याचा छंद सगळ्यांनाच असतो. ‘गुजरा हुआ जमाना’ आपल्याला नेहमीच वर्तमानापेक्षा अधिक रमणीय भासतो, कारण त्यात आठवणींचे गहिरे रंग भरलेले असतात. सुख-दुःखाचे प्रसंग, जुनी माणसं आठवताना आपलं मन भरून येतं.पण अप्रूप वाटावं त्या उत्सवाचं अर्थात हुतात्मा बाबू गेनू यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या घोडपदेव विभागातील  श्रीकापरेश्वर मंदिराच्या प्रांगणात होत असलेल्या महात्मा गांधी जयंती सप्ताहाचं. मराठी मातीत वाढलेल्या, रुजलेल्या […]

पत्ते, बंगला आणि माणसाची निरागसता ! 

नुकत्याच एका छंदिष्ट मित्रांच्या प्रदर्शनामध्ये मी माझ्याकडील विविध आणि विचित्र पत्ते मांडले होते.  १ इंच ते दीड फूट आकाराचे,गोल- लंबगोल, चौकोनी- पारदर्शक- Z आकाराचे -५२ वेगवेगळ्या  मांजरांच्या चित्रांचे- अत्यंत विचित्र आकाराचे, जादूसाठी वापरले जाणारे, विविध सणांची माहिती देणारे अशा विविध प्रकारचे दुर्मिळ पत्ते आणि गंजिफा, टॅरो कार्ड्स, अंध व्यक्तींसाठी ब्रेल मधील पत्ते इत्यादी प्रकारचे हे पत्ते होते. या वेळी एक शोभेची वस्तू […]

चाईल्ड सायकॉलॉजिस्ट बापानं मुलाला लिहिलेलं पत्र

हॉँगकॉँगच्या एका टीव्ही ब्रॉडकास्टर आणि चाईल्ड सायकॉलॉजिस्ट बापानं वयात येणा-या मुलाला लिहिलेलं पत्र त्याचा हा मराठी अनुवाद. नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा…..पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी कि ज्यावेळी जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल. “माझ्या लाडक्या […]

आयुष्याच्या निर्मितीचा रंग कोणता? ‘पांडु’रंग, ‘पांडुरंग’..

आयुष्य निर्मितीचा खरा ‘रंग’ ‘काळ्या’तून जन्मलेला ‘पांढरा’ व पुन्हा ‘काळा’ हे मनोमन पटलं, आणि ‘पांडुरंगा’चा अर्थही पटतो..! ‘काळ्या’ विठ्ठलाला अन्यथा ‘पांडूरंग’ असं विजोड नांव का बरं दिलं असावं..!! […]

काष्टा सोडून वैश्वदेव

एका वाड्यातली गोष्ट.चार पिढ्या आधीची हं.नऊवारी सासू आणि नऊवारी सून असलेल्या काळातली.घरातभ पैपाव्हणे,द्विपदचतुष्पदसहितं असं म्हणताना खरोखर ते असायचे घरात त्या काळातली. घरात कुळधर्म कुळाचार अगदी जसंन् तसं पाळणारं घर ते,आणि पापभिरू सासवासुना! एका कुळाचाराच्या दिवशी सूनबाई देवाचे नैवेद्य वाढत होत्या केळीच्या पानावर.तेवढ्यात सासूबाईंची हाक आली आणि पाठोपाठ सूचना!’सूनबाई,मांजरीची पोरं टोपलीखाली झाक हो.आणि मगच नैवेद्य ठेव देवापुढे’ […]

प्रगल्भता(Maturity) म्हणजे काय ?

प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही जगाला बदलण्याचा नाद सोडून देता, आणि स्वतःच्या सर्वांगीण विकासावर भर देता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हीं लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारता. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्हांला समजायला लागते कि जीवनात प्रत्येकजण आप आपल्या जागी बरोबर असतो. प्रगल्भता म्हणजे : जेव्हा तुम्ही घेण्या पेक्षा देण्यावर जास्त भर देता. प्रगल्भता म्हणजे : […]

वक्तशीरपणा

“तिसरी कसम’ या चित्रपटाचे चित्रीकरण बिहारमधील पूर्णिया जवळच्या जंगलात सुरू होते. दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांना अगदी पहाटेचे एक दृश्य चित्रित करायचे होते म्हणून त्यांनी नायक राजकपूर यांच्या स्वीय सहाय्यकाला दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचला हजर राहण्यास सांगितले. त्याने राजकपूरना हा निरोप देण्यास साफ इन्कार केला. “त्यांचा दिवस सकाळी अकरा वाजता सुरू होतो हे मला ठाऊक असताना माझी […]

बापमाणूस

आयुष्याचा चक्रव्यूह समर्थपणे पेलवणाऱ्या पण काही कारणास्तव असह्य झाल्यामुळं हाताच्या ओंजळीत डोकं लपवून एकटाच ओक्‍साबोक्‍शी रडणारा तो बापमाणूस पाहिला, अन मन हेलावल. काळोखलेल्या आकाशात कडाडणाऱ्या वीजेसारखे विचार एकामागोमाग सुरू झाले …विचारांचं थैमान थांबायला हवं पण विचारांचा प्रवाह मनाच्या खोलवर सैरावैरा फिरत राहिला. पुरुषाच्या सहनशीलतेचा बंध ( काही अपवाद वगळता ) फुटतो आणि तो असहाय होऊन टाहो […]

1 268 269 270 271 272 304
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..