नवीन लेखन...

नारळ….. खोबरं

खोबरं हा मालवणी जेवणातला महत्वाचा घटक … अविभाज्यच… पण अगदि टिपीकल मालवणी तऱ्हा सांगतो… खोबऱ्याच्या. आणि नारळ बागायतदारांच्या… तस बघायला गेलं तर .. नारळाच्या बागा दोन-तिन प्रकारच्या… एक नदिकाठची.. मळ्यातली… दुसरी भरडी दगडगोट्याच्या जमिनीतली, तिसरी भरडी..पण डोंगरातल आपवणी पाण्यावरची.. झोळकातली…. यामध्ये साधारण.. बामण , भंडारी आणि वैश्य हे समाज साधारण चविने खाणारे.. म्हणजे बागायतदार… आता या प्रत्तेक […]

मालवणी ढोल

ढोल आणि मालवणी मुलुख यांच नातं तसं प्राचिनच…. पण तुम्ही बघितलेला ढोल आणि मालवणी ढोल यात जमिन अस्मानाचा फरक आहे…. आत्ताचा अभिप्रेत ढोल सर्वानाच माहित आहे पण मालवणी ढोलाची माहिती सांगतो… मिऴालाच तर फोटोही देईन….. पहिला महत्वाचा फरक बांधणीचा .. याच खोड…बहुधा फणसाचे…. पूर्णपणे आतुन पोकळ लाकुड कातुन ढोलाच्या साईज मधे आणणे एक कलाच होती…. आणी […]

बंध ऑनलाईन मैत्रीचे

तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलं आहे. प्रत्येक जण एकमेकांशी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अशा कोणत्यातरी माध्यमातून संपर्कात आहे. मग एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता मागे राहील तर ती तरुणाई कसली ! तरुण पिढीची अनेक नवी नाती याच नव्या सोशल कट्टयांवर खुलतात. हल्लीची तरुणाई सध्या सोशल मीडियाच्या मदतीने नात्यांचं ‘नेटवर्किंग ’ करण्यात जास्त रमलेली दिसते. पण या […]

५२ मोडी ५६ खोडी

मयेकराच्या शकल्याचा गेल्यावर्षीच लगिन झाला. कमनशिबी पोर… बेवडो घो आणी रोज बिनकारणाचे गाळी…. रांडेच्या ५२मोडीचा आसस वरती जोताच्या काटयेचो मार.. चार दिवसापूर्वी मायेराक ईल्ला रडान आजयेक सांगी होता… तिना कायतरी मंत्र दिल्यान… तसा ताबडतोब बाजार करून घराक गेला…. आणी सांजेक घोवाबरोबर शेंगदाण्याची भाटी करूक गेला… वायच आधिच गेला जोताच्या. ऊगाच गाळी नको म्हणान घोवान जोत बांधल्यान… […]

पिवळा रॉकेल

परवा गावात मोडक्या वडाकडे… म्हणजे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी एक मिटींग घेतली गेली… सर्वपक्षीय.. गावातल्या जुन्या जाणत्यानी बोलवलि… विषय… गावातल्या रस्त्यांची परिस्थीती, आणि ऊपाय… सगळ्यानी आपआपली मतं मांडली… कॉन्ट्राक्टर लॉबीन हिरहिरीन मांडले की रस्ते करतांना गावची सगळी मंडळी समोर असते … आणि काम पाऊस पडापर्यंत चोख आसता . एक पण खड्डा नसतो… आता पाऊसच जास्त तर आम्ही […]

गणपती

गणपती…… कोणीतरी मुंबयवाल्यापैकी सक्याच्या म्हातार्याक विचारल्यान… तात्यानू गणपती म्हणजे नक्की काय वो? जा म्हातार्यान सांगल्यान ता तुमका सांगतय…. अरे गणपती म्हणजे मातयेचो गोळो…प्रत्तेक टायमाक तुमका जाणीव करून देता… तुमकाय मातीच होउचा हा… तेवा माजा नकात…. मालवणी मुलकात ज्या घरात गणपती नाय ता घर सुद्धा हिशोबात धरणत नाय…. हीच घराची मर्यादा…. हीच घराची शोभा… एकच सण वर्षाचो […]

चिमणीची ‘उरलेली पूर्ण गोष्ट’

वेळ साधारण रात्री अकरा साडेअकराची असावी, मोबाईलची रिंग वाजली. एवढ्या रात्री कोणाचा फोन म्हणून माझ्या कपाळावर आठ्या, चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणि मनात भीती अशा संमिश्र भावना एकाच वेळी निर्माण झाल्या. मात्र स्क्रीनवर जेडींचं नाव दिसलं आणि काही क्षणातच या सगळ्या भावना उडण छु झाल्या. जेडींचा आवाज कानावर पडला …. झोपली होतीस का गं? छे छे! देवासमोर बसून […]

रेडिओ दिनानिमीत्त कम्युनिटी रेडिओची माहिती

कम्युनिटी रेडिओ म्हणजे एखाद्या विशिष्ट भौगोलिक भागासाठी किंवा विशिष्ट समाजासाठी असलेला रेडिओ. भारतात कम्युनिटी रेडिओची सुरुवात २००४ साली झाली. सुरुवातीला कम्युनिटी रेडिओ चालू करण्यासाठी असंख्य बंधने होती; पण २००८ नंतर ती बरीच शिथिल करण्यात आली आहेत. शेतीविषयक माहिती देणे, लोकांचे प्रबोधन करणे, शिक्षणविषयक कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवणे ही कम्युनिटी रेडिओची मुख्य उद्दिष्टे असतात. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या […]

जागतिक रेडिओ दिवस

लहानपणी विविध भारती , बिनाका गीतमाला व आज च्या पिढीला विविध एफ.एम. स्टेशन्स द्वारे मनोरंजन करणारा.. एकमेव अद्वितीय – रेडिओ आपल्या लहानपणी रेडिओ हेच मनोरंजनाचे साधन होते. पण त्याचा उपयोग मनोरंजनापेक्षा घडय़ाळासारखा जास्त व्हायचा. मंगल प्रभात सुरू झाली की चला उठा आता.. वाजले किती बघा.. कामगार सभेची स्वरावली वाजली की अगं बाई.. उशीर झाला.. अजून भात […]

नातं, बिघडलेलं..

पंधरा दिवसांपूर्वी एक केरळी ख्रिश्चन जोडपं मला भेटायला आलं होते. निमित्त होतं त्यांच्या १२ वर्षाच्या मुलीची जन्म पत्रिका पाहाणं..! आता अशा या उच्चभ्रू लोकांनी, त्यातही परधर्मीय, जन्मकुंडली पाहण्यासाठी माझ्याकडे का यावं असा पुरोगामी प्रश्न कुणालाही पडण्यासारखा. वय वर्ष १२ची त्यांची ती मुलगी अत्यंत हुशार. सीबीएसई शाळेत शिकणारी टाॅपर. अशा प्रकारच्या शाळेत शिकणाऱ्या कोणत्याही मुलाप्रमाणेच पण जराशी […]

1 269 270 271 272 273 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..