देवा, आम्हाला कायम दु:खात ठेव..
आपण एरवी समाजात वावरताना उच-नीचतेच्या किती पायऱ्या सांभाळून वागत असतो, ते ही नकळत. पैसा, प्रतिष्ठा, पद व क्वचित प्रसंगी शिक्षणही माणसा-माणसांत अदृष्य भिती उभ्या करत असतं. अधिकारी शिपायाशी शक्यतो हसणार-बोलणार नाही, रोजचा सलाम करणारा वाॅचमन तर सर्वांचाच दुर्लक्षीत. रिक्शा-टॅक्सीवाले, वेटर यांच्याशी तरी कुठे लोक बोलतात..! बोलणं जाऊ देत, बघतही नाहीत कधी..वरचा माणूस खालच्या माणसाशी बहुतेक वेळा […]