नवीन लेखन...

राजकारण्यांच्या शाळेतील विषयांची ऊजळणी

काही राजकारणी नेत्यांच जनतेच्या बाबतीतल “नागरिकशास्त्र” हे कच्च असतच… परंतु निवडणुकीच्यावेळी जातीधर्मांच्या “ईतिहासाची” मांडणी ही जरुर पक्कीच असते…. काही नेत्यांना “मराठीचे” आपणच वारसदार आहोत…. असा भयंकर गैरसमज असतोच. राजकारणमध्ये भ्रष्टाचार करताना किमान “भुगोल” तरी लक्षात ठेवावा… असही बंधन नाहीच.. निवडणुकीच्या नतंर सत्तेमध्ये येण्यासाठी कोणाशिही व अनेक अमिषे दाखवत सत्ता स्थापन करण्याची यांची “गणिते” नक्कीच जगावेगळी असतातच… […]

अप्रूप

माणसाला ना, जे मिळत नाही तेच हवं असतं, अप्रूप असतं.. सरळ केस असतील तर कुरळे छान वाटतात, जाड असेल तर बारीक लोकांचं कौतुक असतं ( दाखवलं नाही तरी ) , आणि ज्यांना भयंकर फिरायला आवडतं त्यांना कधी फारसं बाहेर पडायला होत नाही .. यालाच जीवन ऐसे नाव ! आता संसार हा दोन चाकी रथ आहे, दोन्ही […]

डोंगर, कागद आणि लेखन

तो निश्‍चल आहे. परोपकारी आहे. हिरवा, पिवळा, तपकिरी, काळसर रंगाचा आहे. उंच आहे. सखल आहे. बाजूला निवडूंग, सीताफळाची जाळी. हेकळा-टाकळा बहरलेल्या. शेळ्या, मेंढय़ा, म्हशी, गुरं-ढोरं अंगाखांद्यावर घेऊन करतो पालनपोषण . अनेक वाटा येऊन मिळतात त्याला.. पांदीच्या, कच्च्या, वळणी, पाऊलवाटा . डोक्यावर चिंचेचं झाड डेरेदार. चिंचेखाली एक बाल आहे. पसरट मोठा दगड़. त्यावर बसून गारमस्त हवा घ्यायची. […]

आला हिवाळा..

सध्या वातावरणातील गुलाबी थंडी आपल्याला अनुभवायला मिळते. हिवाळा सुरू झाल्याची कुणकुण आपल्याला वाढलेल्या भूकेमुळे समजते. हिवाळ्यात आपला जठराग्नी बलवान होतो. म्हणून या दिवसांत खाण्यात पचायला जड पदार्थ वापरले तरी ते बाधाकारक ठरत नाही. प्रामुख्याने या दिवसात गोड चवीचे पदार्थ अधिक खाण्यात असावेत (मधुमेही रुग्णांसाठी हे लागू नाही) विविध प्रकारची पक्वान्ने आपण हिवाळ्यात सहज पचवू शकतो. रव्याची […]

‘मोदी’ शब्दाचा अर्थ काय?

आपले सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी जी कठोर पावले उचलली आहेत त्याची तारीफ करावी तेवढी कमीच आहे..देशातील सामान्य जनतेला नोटा रद्द केल्याचा त्रास जरूर होतोय तरीदेखील सामान्य जनता मोदींच्या बाजूने ठाम उभी असल्याचं चित्र आहे..आणि जनतेचं असं मोदींच्या बाजूने ठाम उभं असल्याचं एकमेंव कारण म्हणजे मोदी करतायत ते देशासाठी, आपल्यासाठी आणि […]

दोन हजार मंदिरांचं गाव 

नाना फडणविसांच्या वाड्यात शिरण्याआधी दोनशे वर्षाहून जुन्या डौलदार बाओबाब वृक्षाने आमचे स्वागत केले. वाड्याची अवस्था केविलवाणी असली तरी त्याच्या पाठीमागे असलेल्या शेकडो वर्षांपूर्वीच्या घाटांचा व मंदिरांचा एकही दगड आपल्या जागेवरून हललेला नाही. तिथेही कृष्णेच्या पाण्याचं डबकं झालं आहे. पण मंदिरांनी सजलेला तो सुरेख घाट डोळ्याचं पारणं फेडतो. […]

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व मा.पु.लं. चे काही किस्से

काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं. गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ‘ पुलं ‘ गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा […]

अंतु बर्वा

कोकणातल्या त्या मधल्या आळीतल्या ओसरीवर, भोवती माडाच्या काळ्या आकृती हलताना कंदिलाच्या प्रकाशात ती थकलेली सुकलेली तोंडे हे तत्वज्ञान सांगू लागली की काळीज हादरते. “अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी ‘? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो […]

आमचे भाईकाका !

महाराष्ट्राने ज्या लाडक्या व्यक्तिमत्वावर जीव ओवाळून टाकला त्या पु.ल. उर्फ भाईंचा जन्मदिवस येताच मी आठवणींच्या हिंदोळ्यांवर झुलू लागलो. माझं वय होतं अकरा वर्षे. इयत्ता सहावी. एक दिवस आईने माझ्या हातात एक चिटोरा दिला व मला म्हणाली जोग काकांकडे जा आणि त्यांच्याकडे उतरलेल्या पाव्हण्यांची सही घेऊन ये. सही कशाला म्हणतात, ती कशासाठी घ्यायची असते हे न कळण्याच्या […]

1 274 275 276 277 278 304
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..