नवीन लेखन...

देश तसा चांगला, पण आपणच त्याला उल्टा टांगला…

१. बदलत्या काळानुसार प्रत्येक आईवडीलांनी ही गोष्ट समजून घ्यावी की, मुलांना पराठे आणि मुलीला कराटे येणे गरजेचे आहे. २. भारतातीले लोक हेलमेट घालणार नाहीत, पण मोबाईलला स्क्रीनगार्ड नक्की लावणार. म्हणजे डोकं फुटून रक्त वाहत गेलं तरी चालेल, पण मोबाईल स्क्रीनला स्क्रॅच नाही आला पाहिजे. ३. मला देशाच्या गरिबीविषयी तेव्हा माहित झाले, जेव्हा कोणीतरी माझ्या बाईकचा कपडा […]

वाद्यांचे स्वभाव

बासरी – चिरकाल प्रेमात असलेली प्रेयसी. कधी नुकतीच प्रेमाशी ओळख झालेली मुग्धा, कधी प्रियकराच्या मीलनासाठी निघालेली अभिसारिका, कधी विरहाने व्याकुळ झालेली विरहिणी तर कधी त्या कृष्णाशी एकरूप झालेली राधा. प्रेमाचे वेगवेगळे आविष्कार. जलतरंग – मूर्तीमंत आशावाद. जीवनरसाने ओथंबलेला. सगळ्यात आनंद शोधून थुई थुई नाचणारा. हा आनंद आणि आशावाद पण दुस-याला सहज लागण करणारा. ह्याच्या सहवासात आल्यावर  […]

लतावर न लिहिलेला लेख

“लताचा 87 वा वाढदिवस येतोय , काहीतरी लिहिलं पाहिजे ” असं परवा एका मित्राला म्हटलं तेव्हा तो माझ्यावर भडकलाच ! ” त्या कुठे ? तू कुठे ? ( तुझी पात्रता काय ?) आणि तू त्यांना सरळ एकेरीत संबोधन करतोस ? निदान वयाचा तरी विचार ? ” मी त्याला म्हटलं , ‘ हे बघ, आपण दोघेही कोल्हापूरात […]

रुखरुख

आज एक आठवडा झाला. त्या लहान मुलाला मी रस्त्यावर नकळत शोधण्याचा प्रयत्न करते आहे. पण तो कुठेही नजरेस पडत नाही आहे. कुठे असेल तो? मागच्याच मंगळवारची गोष्ट आहे. मी सकाळी दुध आणायला गेले असताना तो माझ्या गाडीच्या समोर धावत धावत आडवा गेला होता. कसाबसा जोरात ब्रेक मारून मी गाडी उभी केली होती आणि गाडी बाहेर येऊन […]

एक स्पर्श

संध्याकाळी शिंप्याकडे जायला निघाले होते. रस्ता ओलांडताना मोबाईल वाजला म्हणून बाजूला उभी राहून बोलत होते. बोलता बोलता सहज समोरच्या रस्त्याकडे लक्ष गेले. एक वयोवृद्ध आजी आजोबा एकमेकांचा हात धरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. दोन पावले पुढे यायचे कि समोरून भरधाव गाड्या यायच्या आणि ते परत उभे राहायचे. असा प्रकार माझे फोनवर बोलून संपले तरी चालूच […]

अन्याय

सकाळी अकरा – साडेअकराची वेळ होती. जरा बाहेरची कामे करून यावी म्हणून निघाले होते. घरात बाहेरची कामेच जास्त असतात. कधी लाईट बिल, पाणी बिल, बाजारहाट, बँकेची कामं वगैरे. आणि ही सगळी कामं सकाळीच करायला लागतात. तशीच त्या दिवशी पण बाजारात जायला निघाले होते. जवळच सेन्ट्रल स्कूल आहे. शाळा सुटली होती. सोसायटीतील लहान मुले परीक्षा संपल्या म्हणून […]

सितारा

सकाळची वेळ होती. सूर्यनारायणाचे आगमन झाले होते. हवेत थोडा गारवा होता. मॉर्निंग walk संपवून खुर्चीत विसावलो होतो. पेपर वाचत निवांत बसावे असा डोक्यात विचार चालू होता. पाहिले तर पेपेर अजून आलेच नव्हते. शेवटी त्यांची वाट बघत बसलो होतो. अलीकडे जरा थकायलाच होतं. उभे आयुष्य पळापळ करण्यात गेले, आता आराम करावा अशी खूप इच्छा होत असे. परंतु […]

नियतीचा खेळ

गेल्या आठ्वड्याभराच्या पूर्ण तणावानंतर डॉ. समर तिन्हीसांजेच्या वेळेस एकटेच घरासमोरच्या लॉनवर शांतपणे वरच्या आकाशाकडे बघत बसले होते. त्यांचा बंगला पण सोसायटीत अगदी एका बाजूला होता. ह्या बाजूला फारशी वर्दळ नसल्यामुळे तसे वातावरण ही अगदी शांतच होते. मधून मधून त्यांच्या ‘rocking-chair’ चा ‘कर-कर’ आवाज त्या शांततेचा भंग करीत होता. एका मोठ्या जागेवर त्यांनी आपला बंगला मागच्या बाजूला […]

नात्यांचा ताजमहाल

पाण्याने दुधासोबत मैत्री केली आणि दुधात एकरुप झाले. दुधाने पाण्याची समर्पित वृत्ती पाहिली आणि म्हणाले, ‘मित्रा तू स्वत्व त्यागून माझे स्वरुप धारण केलेस… आता मीही बघ कशी मैत्री निभावतो ते…. आता तुझे मोल हे तुझे राहिले नाही .. आता बघ मी तुझे आणि माझे मोल समान करुन तुला माझ्या मोलाने विकतो. आणि खरेच ते पाणी दुधात […]

विदारक सत्य

काही केल्या रात्री डोळ्याला डोळा लागत नव्हता. डोक्याला थोडेसे तेल लावून झाले. एक जपाची माळही करून झाली पण डोळा काही मिटत नव्हता. कधी ह्या कुशीवर तर कधी त्या कुशीवर करत करत रात्र कुठे संपली हेच समजले नाही. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे रोजंदा व्यवहार सुरु झाले. आपले शरीर आणि मन ह्या आपल्या रोजच्या जीवन-व्यवहाराशी इतके एकरूप झालेले असते […]

1 275 276 277 278 279 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..