नवीन लेखन...

गुलाबजाम आणि जिलेबी यांचे एकमेकांवर खुप प्रेम

गुलाबजाम आणि जिलेबी यांचे एकमेकांवर खुप प्रेम…दोघांनी नीट विचार केला आणि त्यांच्या आधी, त्यांच्या उपरोक्ष कोणी घरी सांगण्याऐवजी त्यांनीच आपले प्रेम प्रकरण आपल्या आपल्या घरी सांगून टाकले… आता गुलाबजामचे वडील श्रीखंड आणि आई बासुंदी ही साधी माणस…रितीरिवाज जपणारी, सणवार सांभाळणारी आणि तरीही आधुनिकतेची जाणीव असणारी…त्यांचा फारसा विरोध झाला नाही.. जिलेबिचे वडील बूंदीचे लाडू व आई ईमरती […]

सावरकर नावाची दहशत !!!

सावरकर…  त्यांची भिती किती आणि कोणाला वाटायची ह्याची ही कथा ! दिल्लीचे पालम विमानतळ! विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ! विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता. भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता. त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला. हे वयोवृद्ध गृहस्थ होते. हा माणूस फार फार […]

‘इंग्रजी’ माध्यमात शिकणारी ‘मराठी’ मुलं आठवली..

काल सकाळी दादर वरून लालबागला जाण्यासाठी ट्रेन पकडली..ट्रेनमधे फारशी गर्दी नव्हती..आत गेलो तर चार पोलिस शिपाई दोन पोलिस डाॅग्सना घेऊन उभे होते..मस्त राजबिंडे कुत्रे होते..एक लॅब्राॅडाॅर आणि एक लांड्या शेपटीचा डाॅबरमन..छानपैकी दरवाजात उभे होते..मी त्या शिपायांना त्या कुत्र्यांची नांवं विचारली. एकाचं ‘मार्शल’ आणि दुसऱ्याचं ‘डॅन’.. पोलिसांची आपसात चर्चा चालू होती..तेवढ्यात स्टेशन आल्याने एका पोलिसांने त्याच्याकडे असलेल्या […]

चिव काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट

एक होती चिवताई इटुकली-पिटुकली. चिव-चिव करत आंगणात यायची, चिवताई ये दाणा खा, पाणी पी आणि भुर्रर्र उडून जा. आजी! चिवताई खरंच असते का? कशी दिसते? हुशार ग माझी सोनुटली, तुझ्या बाबांना सांगते, चिवताईचा फोटू आणायला…. एक होता काऊ, काळाकुट्ट, मोठे मोठे पंख, नेहमी चिवताईला त्रास द्यायचा. हा! हा! हा!, आजी किती ग!खोट्ट-खोट्ट बोलते तू, काऊ असते […]

गुणकर विठलन राणी 

” काल इतकी धावत – पळत कुठुन येत होतीस ? ” ” अरे , आमच्या तालमी सुरु आहेत ना नाटकाच्या ! तिथे थोडा उशीर झाला . आणि नंतर ट्रॅफिक . ” ” अग , मी सहजच विचारले . आणि अगदी माझ्या एखाद्या भाषणाला तू आली नाहीस , येऊ शकली नाहीस तर मी काही फाशी देणार नाही […]

मराठीत “लागण्याची” गंमत बघा

मराठी भाषा अफाट आहे आणि पुलंसारख्यांनी तिची गोडी आणखीनच वाढवलेय.. एखादा शब्द किंवा क्रियापद घेउन किती सुंदर वाक्यरचना केली जाऊ शकते याचे हे उदाहरण […]

देश तसा चांगला, पण आपणच त्याला उल्टा टांगला…

१. बदलत्या काळानुसार प्रत्येक आईवडीलांनी ही गोष्ट समजून घ्यावी की, मुलांना पराठे आणि मुलीला कराटे येणे गरजेचे आहे. २. भारतातीले लोक हेलमेट घालणार नाहीत, पण मोबाईलला स्क्रीनगार्ड नक्की लावणार. म्हणजे डोकं फुटून रक्त वाहत गेलं तरी चालेल, पण मोबाईल स्क्रीनला स्क्रॅच नाही आला पाहिजे. ३. मला देशाच्या गरिबीविषयी तेव्हा माहित झाले, जेव्हा कोणीतरी माझ्या बाईकचा कपडा […]

वाद्यांचे स्वभाव

बासरी – चिरकाल प्रेमात असलेली प्रेयसी. कधी नुकतीच प्रेमाशी ओळख झालेली मुग्धा, कधी प्रियकराच्या मीलनासाठी निघालेली अभिसारिका, कधी विरहाने व्याकुळ झालेली विरहिणी तर कधी त्या कृष्णाशी एकरूप झालेली राधा. प्रेमाचे वेगवेगळे आविष्कार. जलतरंग – मूर्तीमंत आशावाद. जीवनरसाने ओथंबलेला. सगळ्यात आनंद शोधून थुई थुई नाचणारा. हा आनंद आणि आशावाद पण दुस-याला सहज लागण करणारा. ह्याच्या सहवासात आल्यावर  […]

लतावर न लिहिलेला लेख

“लताचा 87 वा वाढदिवस येतोय , काहीतरी लिहिलं पाहिजे ” असं परवा एका मित्राला म्हटलं तेव्हा तो माझ्यावर भडकलाच ! ” त्या कुठे ? तू कुठे ? ( तुझी पात्रता काय ?) आणि तू त्यांना सरळ एकेरीत संबोधन करतोस ? निदान वयाचा तरी विचार ? ” मी त्याला म्हटलं , ‘ हे बघ, आपण दोघेही कोल्हापूरात […]

रुखरुख

आज एक आठवडा झाला. त्या लहान मुलाला मी रस्त्यावर नकळत शोधण्याचा प्रयत्न करते आहे. पण तो कुठेही नजरेस पडत नाही आहे. कुठे असेल तो? मागच्याच मंगळवारची गोष्ट आहे. मी सकाळी दुध आणायला गेले असताना तो माझ्या गाडीच्या समोर धावत धावत आडवा गेला होता. कसाबसा जोरात ब्रेक मारून मी गाडी उभी केली होती आणि गाडी बाहेर येऊन […]

1 276 277 278 279 280 303
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..