शब्दनाद – चिकू मारवाडी
‘मारवाडी’ या शब्दाचं ‘चिकूशी’ घनिष्ट मेतकूट असल्याचं आपण लहानपणापासून ऐकत आलोय. प्रत्यक्षात आपला संबंध घोलवडच्या खाण्याच्या चिकूशीच जास्तं येत असल्याने, राजस्थानातील मारवाड्याशी त्याचा काय संबंध, असा प्रश्न कधीना-कधी आपल्याला पडतोच. ‘मारवाड्या’चा अविभाज्य भाग असलेल्या ‘चिकू’चा आपण समजतो तसा खाण्याच्या चिकू नामक फळाशी काहीही संबंध नाही हे थोऽऽडा विचार केला तर लक्षात येतं. मारवाड्याचा संबंध कंजूसपणाशी येतो […]