स्वदेशी विचार आणि शिक्षण
हल्लीच्या शिक्षण पद्धतीत होत असलेली देशी भाषांची अवहेलना, नीती व धर्मशिक्षणाचा अभाव, उद्योगधंद्यांची नव्या तऱ्हेची माहिती मिळण्याचा असंभव, कोणत्याही प्रकारे विद्येची खरी अभिरुची उत्पन्न होण्यास जी साधने लागतात त्यांचा अभाव आणि देशासंबंधाने एक प्रकारचा जो योग्य अभिमान उत्पन्न व्हावयास पाहिजे तो उत्पन्न होणे तर दूरच, पण तो उत्पन्न न होण्याबाबत घेतलेली खबरदारी हे हल्लीच्या शिक्षण पद्धतीतील ठळक दोष होत. […]