नवीन लेखन...

कोकणी माणसाचं सुपिक डोकं..!!

कोकणातल्या प्रत्येक मुक्कामात काही न काही नविन शिकायला मिळते. काल परवा देवगडात मुक्कामाला होतो. पावसाने थोडी उसंत घेतल्याने सहज भटकायला बाहेर पडलो होतो.हवेत छानसा ओलसर गारवा जाणवत..चहा प्यायचं मन झालं. एका साध्याशा टपरीत शिरलो. काऊंटर वर एक कोकणी वर्णाची मध्यमवयीन बाई बसली होती. चहा सांगितला आणि सहज इकडे-तिकडे बघत बसलो. माझ्या नजरेला त्या टपरीतली एक वेगळी […]

मुंगी आणि झाडाचे पान

एक धनाढ्य, श्रीमंत व्यापारी होता. त्याचा भला मोठा बंगला होता. त्याच्या बंगल्याला एक सुरेख टेरेस होता. त्या टेरेसवर एक झोपाळा होता, बरीच फुलझाडे लावलेली होती. विश्रांती घेण्याची ही जागा त्याची अत्यंत आवडती जागा होती. एके दिवशी तो व्यापारी झोपाळ्यावर विश्रांती घेण्यासाठी पहुडला होता. तेव्हा त्याचे लक्ष एका मुंगीकडे गेले. ती मुंगी झाडाचे एक वाळलेले पान घेऊन […]

आज ७ ऑगस्ट – नागपंचमी

आज ७ ऑगस्ट, नागपंचमी 1. नाग/साप कधीही दूध पीत नाही, कारण तो सस्तन प्राणी नाही. 2. नाग जिभेने वास घेतो, त्यामुळे तो सारखी जीभ बाहेर कडून आसपास असणाऱ्या प्राण्यांचा अंदाज घेतो. 3. नाग पूर्ण मांसाहारी प्राणी आहे, तो इतर प्राण्यांची अंडी, किंवा लहान प्राणी, जसे उंदीर, बेडूक, सारडा यांना खातो. 4. त्याची स्मरण शक्ती अतिशय अल्प […]

एक विचार

‘दगड’ ‘दगड’ म्हणजे ‘देव’ असतो. कारण तो आपल्या आजूबाजूला सगळीकडे असतो. पाहीलं तर दिसतो. अनोळख्या गल्लीत तो कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो. हायवे वर गाव केव्हा लागणार आहे ते दाखवतो. घराभोवती कुंपण बनून रक्षण करतो. स्वैयंपाक घरात आईला वाटण करून देतो. मुलांना झाडावरच्या कैऱ्या, चिंचा पाडून देतो. कधीतरी आपल्याच डोक्यावर बसून भळाभळा रक्त काढतो आणि आपल्या शत्रूची जाणीव […]

चला देवगडला, पावसाला कडकडून भेटायला..

‘देवगडचा पाऊस’ हा माझा लेख वाचून माझ्या अनेक परिचितांनी देवगडला भिजण्यासाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली.. मलाही तुम्हाला घेऊन जायला खुप खुप आवडेल..इथे पावसाळ्यात जायलाच हवं..पण त्यासाठी काही गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे.. सर्वात महत्याचं म्हणजे उरात प्रचंड हौस हवी. ह्या अटीला ऑप्शन नाही.. देवगडचा पाऊस मनमुराद एन्जॉय करायचा असेल तर सुट्ट्यांचा बळी द्यायची तयारी हवी..किमान दोन […]

मी प्रसवलेला ‘सिद्धांत’

डार्विनचा सिद्धांत सांगतो की माकडापासून माणूस उत्क्रांत झाला.. मला वाटते हा सिद्धांत मनुष्याच्या शरीरापुरताच खरा असावा..! कारण, एकूणच मनुष्याचे आचरट वर्तन पाहाता तो मानसीक पातळीवर अद्याप आपल्या पुर्वजांच्याच पातळीवर असावा अशी शंका घेण्यास भरपूर जागा आहे..!! (आपले राजकीय नेते, अध्यात्मीक ‘बाबा’, मेणबत्ती संप्रदाय आणि दुटप्पी ‘आम आदमी’ म्हणजे आपण सर्व यांच्यामूळे मी प्रसवलेला ‘सिद्धांत’) — गणेश […]

देवगडातला पाऊस

कोकणातला पाऊस हा भयंकर देखणा असतो हे अनेकांकडून ऐकलं होतं, वाचलही होतं. मी कोकणातला पाऊस तसा पाहिलाही होता. परंतू देवगडातल्या ह्या तीन-चार दिवसांच्या निवांत मुक्कामात कोकणातला पाऊस अनुभवला.। आमच्या चारूचं हॉटेल देवगडातल्या समुद्रकिनार्‍यावर परंतू एका लहानश्या उभ्या कड्यावर आहे..हॉटेलच्या बाल्कनीत उभं राहीलं की समोर क्षितीजापर्यंत पसरलेला अथांग दर्या आणि दर्याच, बस्स, आणखी काही नाही..भणाणत येणाऱ्या वाऱ्याला […]

टिप्पणी – ६ : मोहेन-जो-दारो

बातमी : आशुतोष गोवारीकर यांचा ‘मोहेन-जो-दारो’ या सिनेमाबद्दल संदर्भ : ‘लोकसत्ता’ मुंबई आवृत्ती, दि. २४ जुलै २०१६. आजच्या लोकसत्तामध्ये (पुरवणीत) आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहेन जो दारो’ या चित्रपटावर लेख आला आहे. या विषयावर त्यांनी केलेला अभ्यास कौतुकास्पद आहे. या विषयावरील experts ना सुद्धा ते कन्सल्ट करतच आहेत. गेली कांहीं वर्षें मी या संस्कृतीविषयीं वाचन करत आलेलो […]

क्रिया आणि प्रतिक्रिया

अनेकदा असा अनुभव येतो की एखादा मित्र, एखादं नातं आपल्या इतक्या जवळ येते की अवघ्या काही दिवसांतच आपलं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकते. आपले कोणतेही निर्णय, सुख-दु:ख त्यांच्याशी शेअर केल्याशिवाय आपल्याला राहावत नाही..आपण म्हणजे ते आणि ते म्हणजे आपण अशी सर्व स्थिती होऊन जाते.. हे कधी संपणारच नाही असं वाटत असतानाच एक दिवस असा येतो, की अगदी […]

छत्रपती शिवराय : बाजी – पावनखिंडीतला ढाण्या वाघ

शाहीर पहिला : ( प्रास्ताविक ) : पन्हाळ्याहुनी शिवबाराजे पळत विशाळगडीं अंधारातुन सोबत करती मर्द मावळेगडी दुश्मनास चकवून धावती चिखला तुडवत पायीं सुखरुप राजांना न्यायाची या वाघांना घाई पहाट होतां दिसे पायथा, मागुन दुश्मन धावे ‘आतां कैसें पुढला वेढा फोडुन वरती जावें ?’ बोलत बाजी, ”थांबूं आम्ही, खिंडिस लढवत राहूं निजदेहांचे बांध बनवुनी दुश्मन अडवत राहूं […]

1 279 280 281 282 283 303
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..