नवीन लेखन...

शिवराय आणि बाजीरावाचा महाराष्ट्र

दादरा, नगर हवेली, वापी या भागात मी फिरलो आहे. चर्चगेट पासून ते वापी पर्यंत महाराष्ट्र गिळला गेला आहे. उंबरगाव महाराष्ट्रात सामील करण्याचा लढा संपला…. इतिहास जमा झाला. बेळगाव, कारवार, निपाणीचे लोक महाराष्ट्रात येण्यासाठी महाराष्ट्राच्या दरवाजावर अनेक वर्षे टक्कर देत आहेत. त्यांचा कपाळमोक्ष झाला. कानडी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खावून त्यांची हाडे पीचली आहेत पण अजूनही ते लढत […]

चार धाम

काही वर्षापूर्वी, ब्रह्मविद्या साधना मंडळाच्याबरोबर सिद्धटेकचा गणपति व भीमा शंकर ही ठिकाणे बघण्यासाठी एक ट्रीप आयोजित केली होती. या ट्रीपबरोबरच आमचे ‘केदारनाथ’ सोडून इतर सर्व ज्योतिर्लिंग पाहून झाली होती, विनासायास झाली होती. तेव्हा पासून माझ्या मनात राहिलेले ज्योतिर्लिंग, केदारनाथ पाहण्याची खूप उत्सुकता होती. काही कारणांसाठी शशीचा यास ठाम नकार होता. केवळ आपापसात वाद नकोत म्हणून मी तिथे जाण्याचा तेव्हा हट्ट केला नाही. […]

भिक्षापात्र

राजमहालाच्या दारात मोठा गदारोळ उडाला होता. जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती. प्रसंगच तसा होता. त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली भिक्षा मागण्यासाठी आला होता. राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला. काय हवं ते माग. मिळेल. भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फारच छोटं आहे. त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे. पण, वचन […]

अमेरिकेतील सुखान्त

कर्करोगाने ग्रासलेल्या आणि अत्यवस्थ झालेल्या माझ्या जवळच्या नातलगाची शेवटची भेट व्हावी म्हणून पत्नीसमवेत मी मध्यंतरी तातडीने अमेरिकेला गेलो. न्यूयॉर्क येथे पोहोचल्यावर आंघोळ वगैरे उरकून ‘हॉस्पिस’(हॉस्पिटल नव्हे) गाठले. ज्या रुग्णांना कुठल्याही औषधोपचारांनी बरे करणे शक्य नसते आणि रुग्णाचा अंत:काळ जवळ आलेला असतो अशांना ‘हॉस्पिस’मध्ये ठेवतात. त्या ठिकाणी कुठलाही रोग बरा करणारा औषधोपचार होत नाही, परंतु अटळ असणारा […]

छत्रपती शिवरायांचे पुतळे जगात सर्वात जास्त

सर्व मराठी माणसांची आणि भारतीयांचीही मान उंचावेल अशी आश्चर्यचकीत करणारी एक बातमी नुकतीच वाचली. बातमीची सत्यासत्यतता तपासता येणं कठीण आहे. पण ही संख्या जर खरी असेल तर…… महापुरुषांचे पुतळे ही काही फक्त भारतीयांची मक्तेदारी नाही. जगातील अनेक शहरांमध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत. मात्र जगात सर्वात जास्त पुतळे कोणाचे असतील बरे? जगात सर्वात जास्त पुतळे आहेत छत्रपती […]

पॉवर ऑफ चॉइस

सुप्रसिद्ध साहित्यीक चेतन भागत याने सांगीतलेला हा किस्सा आहे. मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहीली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालुन माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की […]

व्यसनाधिनता आणि ती…

व्यसनांच्या दिशेने जर स्त्रियांची पावले वळ्त असतील तर त्यांना वेळीच आवर घालावा लागेल अन्यता आपल्या समाजाचं, देशाचं, आपल्या देशातील भावी पिढीचं आणि पर्यायाने स्त्रियांच भविष्यही धोक्यात येईल. त्याहूनही दखल घेण्याजोगी गोष्ट म्हणजे गुन्हेगारी आणि व्यसनाधिनता यांचा फारच जवळ्चा संबंध असतो त्यामुळे गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. […]

समर्थ रामदास स्वामी – भाग १०

सत्व गुणाला मनुष्य देहातला अत्यंत उत्तम गुण म्हणून समर्थांनी वर्णिले आहे. समाजाचे व्यवहार अविरथ चालले आहेत याचे मूळ कारण समाजात सत्व गुणी माणसे आहेत.प्रतेक माणसात सत्व ,रज आणि तमो गुण असतात. परंतु ज्यात सत्व गुणाचे प्राबल्य असते तो माणूस समाजासाठी मोठा आधार असतो.वैयक्तिक स्वार्था पेक्षा परोपकार ,सेवाभाव , करुणा ,प्रेम,समाधान ,निस्पृह व्यवहार ज्याच्या ठाई असतात तो […]

बाटलीतले पाणी

बाटलीतले पाणी विकत घेउन पिणे ही एक फॅशन झालेय का? हा प्रकार गेल्या काही वर्षातच फोफावला आहे. खरं आहे की बाटलीतलं पाणी शुद्ध असतं, त्याने पोटाचे विकार-बिकार होत नाहीत वगैरे वगैरे. पण त्यासाठी विकत घेतलेल्या बाटलीतलंच पाणी प्यायला हवं असं कुठे आहे? घरातूनही पाणी बाटलीत भरुन घेउन जाता येतंच की? पण त्याने स्टेटस खाली येतं असं […]

यमुनाकाठी दैवीय शांती यज्ञ आणि आसुरी अहिष्णुता

द्वापारयुगात कृष्णाने यमुनेच्या तीरावर प्रेमाचा संदेश दिला होता. त्याच यमुनेचाकाठी भव्य दिव्य अश्या मंचावर  दैवीय प्रेरणेने  सर्व पंथीय धार्मिक  नेते जमले होते. तिथे पोपचे प्रतिनिधी होते, इस्लामी जगतातल्या विभिन्न पंथांचे  देश-विदेशातील धार्मिक नेते हि होते. या शिवाय भारत सहित एशियातील सर्व अन्य पंथीय धार्मिक नेते हि जमले होते. या शिवाय जगातल्या आदिम जमातीतील नेते हि तिथे […]

1 280 281 282 283 284 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..