नवीन लेखन...

श्रीलंका येथील योगायोग विंदा श्रीगणेश

श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथून १५० मैलावर असणार्‍या काटरगाव सुब्रमण्यम मंदिरात श्री गणेशचे दर्शन घडते. या मंदिरात श्री गणेशाचे स्वतंत्र स्थान असून गजाननाचे पूजन अर्चन वैदिक पद्धतीने केले जाते.
[…]

दोष कोणाचा? पालकांचा का मुलांचा !

देशातील तरुणाईला आणि विद्यार्थ्यांना चांगल्या आदर्शांची वानवा असावी आणि संस्कारात पालक, शिक्षक आणि समाज कुठेतरी कमी पडतो आहे की काय अश्या संशयाच्या सावटाखाली एकामागोमाग एक भयंकर आणि हृदय हेलावून टाकणाऱ्या घटना घडताना दिसतात आणि मन विषण्ण होते.
[…]

समलिंगी संबंध – मानसिक विकृती !

समाजात कश्या कश्याचे लोण आणि फॅशन येईल हे काही सांगता येत नाही. समलिंगी संबंधात काही भारतीय पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करीत आहेत. आपण कोणाबरोबर काय करतो, कुठे आणि काय बोलतो याचे जरासुद्धा भान नसते. परकीय देशांत समलिंगी संबंधाला मान्यता आणि कायदा केला असला तरी ही भारतीय संस्कृती नाही आणि भारतात कुठल्याही धर्माची मान्यताही नाही. मानव, पशु, पक्षी, आणि किटकांची वंशवृद्धी सातत्याने आणि निकोप वाढीसाठी भिन्नलिंगी स्त्री-पुरुषांची परमेश्वराने निर्मिती केली. याचाच अर्थ त्यालासुद्धा समलिंगी संबंध अभिप्रेत नाहीत.
[…]

ज्ञानेश्वरी, अध्याय ६ ओवी ८०

जगणे ही मोठी आनंदयात्रा आहे. पण ह्या आनंदयात्रेचा वारकरी असणारा माणूस मात्र शुभ अशुभाच्या कल्पनांच्या ओझ्याखाली दबून जात असतो. या सर्व कल्पना निर्माण कोणी के्ल्या याचा आपण विचार करत नाही.
[…]

बालगंधर्व

मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर एकूण भारतीय चित्रपटसृष्टीतच दर्जेदार चरित्रपटांची वानवा आहे. शंभर वर्षांची परंपरा सांगणार्‍या भारतीय चित्रपटसृष्टीला खरं तर अशोभनीय अशी ही बाब आहे. परंतु, ही बाब ठळकपणे जाणवून देणारी एक आशादायक घटना म्हणजे ‘“बालगंधर्व”’ हा चित्रपट!
[…]

मस्तकावर शिवलिंग व घंटाधारी रोम येथील द्विभूज गणेश (गुरु) मूर्ती

रोम येथील बार्जीयन मुझियम वेलोस्ट्रेज येथील मस्तकावर शिवलिंग व घंटाधारी द्विभूज गणेश (गुरु) मूर्ती रोम आणि भारतीय संस्कृती ह्यांच्या एकत्रीकरणाचा उत्कृष्ट नमुना आहे. शिव पुत्र, सुर्यपुत्र आणि विघ्नहर्ता म्हणून जगात प्रसिद्ध असलेला श्री गणेश येथे विद्यादायक गुरुस्वामी म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. येथे श्री गणेश गुरु म्हणून ओळखला जातो.
[…]

महाराजलीला मुद्रा श्री गणेश – कंबोडिया

ही गणेशमूर्ती १३ व्या शतकातील असून ती ब्राँझची बनविलेली आहे. मूर्तीवर विविध अलंकार असून ते हिरव्या रंगात दाखविलेले आहेत. या गणेश मूर्तीला दोन हात असून अर्धवट वाकलेल्या स्थितीत बसलेली आहे. उजव्या हातात मोडलेला सुळा व डाव्या हातात ग्रंथ आहे. यातच मांगल्य व ज्ञानाचे दर्शन होते.
[…]

सूर्य विनायक – नेपाळ

भारतीय गणेश उत्पत्ती विषयी असलेली कल्पना डावलून नेपाळ संस्कृतीने आपले गणेश दर्शन घडविले आहे. गणेश हा शिवपुत्र न मानता तो स्वयंभू असून एका सूर्य किरणात त्याचे दर्शन आले आहे असे मानून सूर्य-विनायक हे अधिष्ठान दिले आहे. जगातील इतर राष्ट्रात सुर्यपुत्र हा मान्य असलेला संकेतही नेपाळ संस्कृतीला मान्य असलेला दिसत नाही. ह्या सूर्य विनायकाचे मंदिर काठमांडू पासून आठ मैलावर भाटगांव येथे आहे. ते भव्य आहे. नेपाळच्या चित्रांकित नृत्यगणपतीच्या सभोवती चार गणपती असतात. त्यातील भव्य व मुख्य देवता सूर्य विनायक होय.
[…]

महापियेन – श्री गणेश – ब्रम्हदेश

ब्रम्हदेशातील नदी किनारी वसलेल्या प्रदेशातील मोनलोक म्हणून ओळखला जाणारा हा गणेश “व्यापारी विघ्नहर्ता” म्हणून प्रसिद्ध आहे. ही मूर्ती ६व्या शतकातील असावी. श्याम वंशाच्या कोणा आयुथीयान कारागिराने ही बनविलेली असावी. ह्या गणेशाला महापियेन अशी संज्ञा आहे.
[…]

माझी चेन्नई सफर

माझा हा चेन्नई प्रवास साधारणपणे २७ तासांचा होता व गेली कित्येक वर्षे मी इतक्या लांबवरचा प्रवास केलेला नसल्यामुळे हे २७ तास कसे पार पडणार याबद्दल शंकाच होती. त्यात हा दक्षिणेकडचा प्रदेश अगोदरच मिळालेल्या ब-या-वाईट अशा ब-याच मत-मतांतरांमुळे मनात उगीचच घर करून बसलेला. परंतु चिरंजीवांना भेटण्याच्या निमित्ताने व आनंदात नवीन प्रदेश पहावयास मिळणार असल्यामुळे दुःखापेक्षा सुखच अधिक वाटत होते
[…]

1 291 292 293 294 295 302
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..