पत्र अजन्मा मुलीचे
तू मला आताच असे उडवून लावू नकोस… कदाचित या जगात मी महान कार्य करून दाखवेन. मी तुझ्या प्रेमाचे बीज आहे. मला तुझ्या पोटी जन्म घेऊ दे! या फुलाला फुलू दे, आई! हे बघ- मी नाजूक, कोवळ्या हातांनी तुला विनवणी करते. मला समजून घे. मला वाचव, आई! आता पपा येतीलच तुला क्लिनिकमध्ये घेऊन जाण्यासाठी! तू त्यांना नकार दे! माझी शप्पथ आहे तुला! त्यांना तू समजावून सांग! माझी हत्या करण्यासाठी कोठेही जाऊ नकोस! त्यांनी तुला क्लिनिकला नेलेच बळजबरीने, तरीसुद्धा तू परत घरी निघून ये, आई! मी इवलासा श्वास घेऊन जगत आहे. माझे जीवन तू हिसकावून घेऊ नकोस! मला निर्दयपणे मारू नकोस आई! आई, हे तू कधीच करू नकोस! […]