जिव्हाळ्याचं बेट
लहानपणी मला तुझ्या आजोळी नातेवाईक किती, असा प्रश्न विचारला की मी लगेच सांगायचे, पाच मामा, पाच मावश्या, मग सगळ्यांची नावं सांगायचे. मावश्यांची नावं सांगताना अक्का, ताई, शकू, शालू आणि जोशी असं सांगायचे. बाकी सगळ्यांची नावं घेऊन मी पुढे मावशी म्हणायचे आणि या मावशीला मात्र जोशी असं आडनाव घेऊन मावशी म्हणायचे. […]