नवीन लेखन...

विवाह संस्था

उंची वस्त्रं, दागदागिने, शृंगार, आराम, संपत्ती यापैकी कशाचंच या आश्रमाला वावडं नाही. पण त्याचबरोबर या आश्रमावर जबाबदायाही तितक्याच समाजातील बालकं आणि वृद्ध यांच्या संरक्षणाची जबाबदारी गृहस्थाश्रमाची संन्यासाश्रमातील ईशसेवा आणि जनसेवा करीत राहणाऱ्या विरक्तांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी गृहस्थांनीच पाहायची. आयुष्यातल्या या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव आपल्या विवाहविधीमध्ये पुरेपूर करून दिली जाते. […]

लोककलेतून स्वदेशी वारे

लोककला आणि स्वदेशी या दोन संज्ञांचा विचार करत असताना एक लक्षात येते की, या दोन संज्ञा एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. परस्पर निर्मिती, योग यातून दिसून येतो. ‘स्थानीयता’ या दोन्ही संज्ञाचा मूलाधार आहे. […]

व्यंगचित्र साप्ताहिकाचा पहिला माज-हिंदुपंच

मराठीतल्या पहिल्या व्यंगचित्र साप्ताहिकाचे नाव आहे हिंदूपंच. त्याचा पहिला अंक २१ मार्च१८७२ रोजी प्रसिद्ध झाला. ठाणे शहरातून एक आगळ्या वेगळ्या प्रकारचे वृत्तपत्र काढण्याचा प्रयत्न तब्बल १४ वर्षांपूर्वी झाला. त्याला निश्चितपणे ऐतिहासिक महत्त्व आहे. गोपाळ गोविंद दाबक हे त्याचे मालक चालक संपादक होते. पुढे त्यांची जबाबदारी कृष्णाजी काशिनाथ ऊर्फ तात्या फडके यांच्यावर आल्यावर त्यांनी त्या पत्राचा प्रभाव चांगलाच वाढवला. […]

देशी हुन्नर आणि स्वदेशीपणा

स्त्यावरून चालताना आपले पाय अचानक थबकतात… कळत नाही पण आपण आपोआप थांबतो.. कारण कुठेतरी बारीक आवाजात लतादीदींचे सूर कानावर पडतायत. जहांगीर आर्ट गॅलरी पाहून मन थक्क होतं… रेषा, वर्तुळ, चौकोन, मानवी भावमुद्रा, विविध रंगांची उधळण. मन प्रसन्न होतं. […]

उपनयन विधी

नुकतीच मैत्रिणीच्या मुलाची मुंज झाली. आपण केवढा प्रचंड खर्च केला हे ती मोठ्या कौतुकानं सांगत होती. देण्याघेण्याच्या साड्या, घरच्या लोकांचे उंची कपडे, व्हिडिओ कॅसेट… खर्चाच्या अशा असंख्य वाटा… याला पर्याय म्हणून दुसरी मैत्रीण सांगत होती ‘छे! माझा असल्या विधींवर विश्वासच नाही!’ आणि मी विचार करू लागले. जुन्या काळानुसार आठवं वर्ष हे मुलाचं विद्यार्जन सुरू करण्याचं वर्ष. या विद्यार्जनाची सुरुवात मुंज किंवा उपनयन संस्काराने होई […]

मुद्रित माध्यमांचा उदय आणि विकास

सहाय्यक प्राध्यापक वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मुद्रित माध्यमांचा इतिहास रंजक असला तरी तो मानवाच्या प्रगतीचा साक्षीदारही आहे. तंत्रज्ञानातील बदलाबरोबरच मुद्रित माध्यमांतील स्थित्यंतरे समजून घ्यायची असतील तर निश्चितपणे हा इतिहास नेमकेपणाने लक्षात घेणे आवश्यक आहे. […]

आपण आपल्याशी

साधनाच्या अधीन असलेल्या प्रत्येक सुखाला भारतीय संस्कृतीने कमी महत्त्वाचं मानलं. कारण सुखाचं साधन जवळ असल्याचं सुख जेवढं मोठं, तेवढंच ते साधन नष्ट झाल्याचं, हरवल्याचं दुःखही मोठं ! टी. व्ही., रेडिओ, कॅसेट प्लेअर, व्हिडिओ अशी असंख्य करमणुकीची साधनं आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनलीत आणि त्यात फारसं गैर काही नाही. उलट काही प्रमाणात ते अपरिहार्यच आहे. रोजचं जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक धकाधकीचं, चिंतेचं बनतं आहे. […]

आभाळ हळूहळू काळवंडत जाते आहे…

आयुष्याच्या उतारवयात आदर काय असतो आणि त्याची महती काय असते हे लख्खपणे जाणवायला लागते. या वयात आसक्ती आणि ओढ काय असते आणि त्यातून मोकळं कसं व्हायचं ते समजतं. निसर्गाचे नियम हेच जगण्याचे नियम असतात. प्रवाहासोबत वाहत राहणे, मनाचा समतोल टिकवून ठेवणे हेच यापुढचे जगणं असणार आहे. […]

माध्यमांचे अंतरंग  एक दृष्टिक्षेप

माणूस आणि जीवसृष्टीतील इतर प्राणीमात्र यात एकच मोठा फरक आहे तो म्हणजे माणसात जिज्ञासा अथवा कुतुहल असते इतर प्राणीमात्रात ती नाही. या जिज्ञासेपोटी माणूस विचार करीत गेला आणि त्याचा मेंदू अधिक तल्लख झाला. माणूस केवळ स्वतः चा विचार करीत नाही तर इतरांचा, जीवसृष्टीचा व त्यापलीकडचाही विचार करतो. या मानवी जिज्ञासेतूनच माध्यमांचा जन्म झाला. ‘माध्यम’ हा शब्द मुळात ‘मिडियम’ या असिरिअन शब्दापासून तयार झालेला आहे. […]

जॅकी चॅन… एक ग्रेट भेट

जॅकी चॅन म्हणजेच चॅन कॉग-संग याचा जन्म ७ एप्रिल १९५४ रोजी हॉगकॉग येथील व्हिक्टोरिया पिक विभागात झाला. त्याच्या वडिलांचे नाव चार्ल्स आणि आईचे ली-ली-चॅन . जॅकी चॅन चे टोपण नाव होते ‘ पाओ-पाओ ‘ म्हणजे ‘ कॅनॉनबॉल . तो लहानपणापासून अत्यंत उत्साही होता. त्याने लहानपणी शालेय शिक्षणात फार प्रगती केली नाही. […]

1 33 34 35 36 37 301
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..