नवीन लेखन...

मुक्ती

आयुष्याच्या प्रवासात बर्‍याच घटना घडत असतात.कधी त्या आनंददायक असतात,कधी क्लेशदायक कधी मजेशीर,कधी खट्याळ,कधी खट्टया-मिठ्या तर कधी… विलक्षण…आणि अविश्वणीय…असाच एक अनुभव आपल्याशी शेअर करतोय… […]

जत्रा

मोठ्याबाबा हे आमचं खांबे गावचे ग्रामदैवत! कायम सुखा दुःखाला आम्ही त्याला साकडं घालणार “यंदाचा पाऊस, कसा? काय? किती? कधी? कोणत्या नखितरात ? पिकं कोंती करू? दुखणं, बहानं, पोरा पोरींच्या लग्नाच्या अडचणी, सासु सुनाचा तंटा, पोरीचा सासुरवास ” या सगळ्या गोष्टींना आम्ही तिथं देवापुढे गाऱ्हाणं मांडायचं अन् मग तिथून एकदा हिरवा देवानं कंदील दिला की तसं घडलंच समजायचं. म्हणून सगळ्यांचा तिथं जाम विश्वास बसलेला. […]

महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी

महाराजा सयाजीराव यांचे बडोदा राज्य आणि महात्मा गांधीजी यांचे जन्मगाव एकाच म्हणजे गुजरात राज्यात येते. महात्मा गांधीजी आणि महाराजा सयाजीराव यांचा स्नेह दृढ होता. […]

कॅाफी पुराण

घरी कॅाफी व्हायची ती फक्त भजनी ग्रूप घरी येणार असेल तेव्हा!किंवा अजिबात कधीही चहा न प्यायलेले, “फक्त कॅाफीच” पिणारे पाहुणे घरी येणार असतील, तेव्हा!तेव्हाही शेजारच्या वाण्याकडून कॅाफी पावडर आणायची आणि साधी कॅाफि बनवायची!
भजनी मंडळाच्या वेळी मात्र छान दाट, ताजी वेलची , जायफळ पावडर घालून, खास कॅाफी बनवली जायची! मला ती गोड कॅाफी आवडायची, आणि जास्ती ती उकळत असतांनाचा वास आवडायचा!.. इतकंच माझं कॅाफी बद्दल प्रेम आणि ज्ञान !
जेव्हा कॅाफी बाटल्यातून, छोट्या साशा तून मिळायला लागली तेव्हा ब्रू,टाटा,नेस कॅफी अशी त्यांची नांवे कळायला लागली. […]

हाल्या भुसा खातो

पोळ्याचा सन दोन दिवसावर आलता.घरात अठरा विश्व दारीद्र्य.त्यात घरातला सगळा दाळदानाबी संपला व्हता.देवालं निवदालंपण दाळ,गुळ नव्हते.पहाटं उठल्या उठल्याच बायकोनं किरकिर कराया सुरवातं केलती.“मी हाय मनुन टिकली या घरात….” हे जगातलं सगळ्यात जास्त बोललं जाणारं वाक्य तीनं पुन्हा एकदा मलं फेकुन मारलं व्हतं.. […]

मुंबापुरीच्या झुकझुक गाडीतले प्रवासी

लेखाचे शीर्षक वाचून म्हटलं असाल ना की काय पोरकटपणा आहे म्हणुन? अहो, आपला लोकल प्रवास जर शांतपणे आठवाल तर तुम्हांला जाणवेल की लहानपणी जे आपण जगायचो तेच बालपण आपण लोकल प्रवासात पण जगतो. […]

‘चोखोबा’ माझा गणपती!

‘गणपति’ ही देवता सर्वच संतांनी पूजनीय मानलेली आहे. जवळपास सर्वच संतांनी गणेशवंदना केलेली दिसते. पण गणपती आणि संत हा अनुबंध अनेक अर्थांनी विशेष वाटतो. केवळ संतांची गणेश वंदना पाहून नव्हे, तर संत आणि गणपती यांच्यामधील अद्वैताचं नातं प्रतीत होतं म्हणून. […]

बाॅबी ५० वर्षांची झाली

परवाच्या दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर २०२३ ला – ” बाॅबी ” – ५० वर्षांची झाली…कोण ही बाॅबी ? – असा प्रश्न आज नवीन पिढीला पडू शकतो कारण आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात लव्ह वगैरे सगळं एक व्यवहाराचा भाग असल्यासारखं वाटू लागले आहे पण आज जे साठीत आहेत त्यांना निश्चितच असला प्रश्न पडणार नाही कारण बरीच वर्षे बाॅबीने भुरळ घातली होती…
बाॅबी हा सिनेमा…. […]

संस्कृती रक्षण

संस्कृती ही माणसाच्या वर्तनात असते. सदाचरणात असते. माणूस अतिलोभी, मत्सरी असेल तर तो सदाचारी असू शकत नाही. त्याच्यातले हे दोष घालवण्याचं काम धार्मिक स्तोत्रं मग ती कोणत्याही धर्माची असू देत करत असतात. म्हणून लहानपणापासून संस्कारक्षम, पापभीरु वयापासून त्यांची शिकवण द्यायची. […]

सेल्फी

अनेकजण सागतात मुलगा चार वर्षाचा होईपर्यंत त्याच्या हातात ‘ स्क्रीन ‘ देवू नये म्हणजे मोबाईल किवा तत्सम गोष्ट कारण वयाच्या ३ ते ४ वर्षापर्यंत त्याच्या मेदूची वाढ झपाट्याने होत असते जर त्याच्या हातात त्यावेळी ‘ स्क्रीन ‘ अथवा दुसरी वस्तू दिली तर त्याचे विचार त्याभोवतीच फिरत असतात त्याला तीच एकच वस्तू गुंतून ठेवते परिणामी त्याच्या मेदुच्या पूर्ण वाढीस अडथळा निर्माण होतो असे म्हणतात, त्याच्या मेदूची वाढ सर्वाकष होत नाही असे म्हणतात. […]

1 35 36 37 38 39 301
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..