नवीन लेखन...

एखादे पद मलाही द्या हो!

माणसाची ओळख आता माणूस म्हणून उरलेली नाही,तो कुठल्या तरी पदावर असला तरच त्यास प्रतिष्ठा आहे. हजारों प्रकारची बिरुदे प्रतिष्ठेची बनली आहेत. कोणते तरी बिरुद असल्याशिवाय आपणास कुणी ओळखते की नाही,अशी शंका आता येऊ लागली आहे. […]

लेबल

लेबल, उपाधी,बिरुद,पदनाम एकदा चिकटले की अविभाज्य भाग होऊन जाते, काही केल्या ते सूटत नाही, नोकरीतून निवृत्त झाले तरी त्याचा ससेमीरा साथ सोडत नाही. लेबलमध्ये एकदा मनुष्य अडकला की तो त्यातून बाहेर पडणे शक्य नसते.चोविस तास लेबल घेऊन जगणारी माणसे आपले जीवन हरवून बसतात. […]

संस्कारित जीवन

भारतीय संस्कृतीनं जीवनाच्या सर्व अंगांचा विचार केला आहे. हा विचार करताना या संस्कृतीचे पाय सदैव जमिनीवर राहिले आणि म्हणूनच ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ । असा संपूर्ण विरक्तीचा विचार या संस्कृतीनं दिला असला तरी त्या परब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी जीवनाचा, जीवनातल्या सुख-सुविधांचा तिरस्कार तिनं शिकवला नाही. माणसाच्या ऐहिक गरजा, त्या पूर्ण करण्यासाठी लागणारं वैभव या साऱ्यांची तिला जाण आहे व म्हणूनच ‘अभ्युदय’ आणि ‘निःश्रेयस ‘ असे जीवनाचे दोन्ही भाग तिनं गौरवले आहेत. […]

शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ : कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील हे आधुनिक महाराष्ट्राला घडविणारे एक महत्त्वाचे शिल्पकार आहेत. भाऊराव पाटलांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी स्वातंत्र्यपूर्व काळातील कोल्हापूर संस्थानातल्या हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगौंडा देवगौंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई असे होते. […]

पंचप्राणांचा प्राण

सप्रेम नमस्कार ! मंडळी आपल्या शरीरात पाच प्राण वसत असतात ज्यांच्या जागृतावस्थेयोगे आपण जीवन जगंत असतो आणि हे पंचप्राण म्हणजे अपान , व्यान , उदान , समान आणि ब्रह्मण आज मी तुम्हाला या पंचप्राणांमधेहि जो एक प्रमुख असतो , अशा एका पंचप्राणांच्या प्राणा विषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. […]

उत्सव की औपचारिकता?

आपल्यातील सगळेजणच Wish you best of luck, Happy Journy वगैरे म्हणत असतात. फुलांचे गुच्छ हातात देत असतात. एकटी आई मात्र एकच वाक्य उच्चारते, ‘गेल्यावर पत्र टाक रे बाबा! ” कसल्याही शुभेच्छा व्यक्त न केलेल्या त्या वाक्यामध्ये सगळ्या शुभेच्छांचा वर्षाव जाणवतो. औपचारिकतेची सगळी फुलं तेव्हा मलूल वाटायला लागतात. […]

गणपतीची व महाराष्ट्रीयांची आवड एकच नाट्य आणि राजकारण

गणेशोत्सव हा मराठी माणसाच्या चित्तसागराला आनंदाची भरती आणणारा महोत्सव आहे. गणेशोत्सवात मराठी माणूस शरीराने आणि मनानेही रंगून जातो. महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यात, कुठल्याही शहरात, कुठल्याही गल्लीबोळात गणेशोत्सवाच्या १० दिवसांत उत्साहाला नुसते उधाण आलेले असते. […]

स्त्री प्रतिमा

अध्यात्म ‘ मोक्षप्राप्तीच्या मार्गातली धोंड म्हणून तिचा उल्लेख करतं, पुरुषाच्या ध्येयप्राप्तीमध्ये स्त्री ही अडथळा आणते कारण तिला पुरुष हवा असतो तो ऐहिकसुखात कालक्रमण करण्यासाठी, असं काही सामाजिक महत्त्वाच्या कादंबऱ्यांमध्ये म्हटलं आहे. पण हे कितपत खरंय? उलट त्याग, समर्पण आणि ज्याच्याबरोबर सात पावलं चालली त्याला त्याच्या सगळ्या मार्गावर आजन्म साथ देण्याची तयारी यासाठीच तर भारतीय स्त्रिया प्रसिद्ध आहेत. […]

1 36 37 38 39 40 301
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..