नवीन लेखन...

मंतरलेले दिवस – भाग १

ग्रामीण जीवन यावर माहिती. आता लोक गुरे पाळत नाहीत. दाढ भाजत नाहीत. काही लोक तर शेतीच करत नाही. एके काळचे वैभव लयाला जात चालले आहे. […]

हुसेन, दाली आणि रझा – रेषेच्या तीन बाजू

चित्रकार असो , लेखक असो . कवी असो ज्याचे त्याचे स्वतःचे असे विश्व् असते. तो त्यात रमतो तर काहीजण अत्यंत चातुर्याने आपला कार्यभागही साधू शकतात. अशी अनेक प्रकारची व्यक्तिमत्वे आजूबाजूला बघावयास मिळतात. चित्रकार किंवा चित्र काढणे आणि त्याचा अभ्यास करणे या गोष्टीना आपल्या मध्यमवर्गात कधीच सहजपणे थारा मिळत नाही. […]

कटकटी

जीवन म्हणजे जशी कटकटीची मालिकाच होय.अडचणी, अडथळे पार करतच मार्गक्रमण करावे लागते.कोणतेही कार्य सुरळीत पार पडत नाही.सततची परवड हतबल करते.सहज सोपे वाटणारे काम देखील अडथळ्यांविना पूर्ण होत नाही. […]

मध्यप्रदेश आणि मराठी अस्मिता – 2

महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या अंदाजे १८ टक्के मराठी माणूस हा बृहन्महाराष्ट्रात वास्तव्यास असतो. मराठ्यांच्या साम्राज्याला टिकविण्यासाठी आणि एकेकाळी त्यांचा झेंडा अटकेपार फडकविण्यासाठी, निमूटपणे मराठ्यांच्या सैन्याबरोबर बृहन्महाराष्ट्रात गेलेला हा मराठी माणूस गेल्या २५० पेक्षा जास्त वर्षांपासून त्या त्या प्रांतात आपापल्यापरीने स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेत आनंदी आहे. […]

खरा गुरु

खूप शिकलेल्या व्यक्तीला पाश्चात्य देशात ‘वेल-रेड’ (खूप वाचलेला) म्हणतात. तर भारतीय संस्कृतीत बहुश्रुत (खूप ऐकलेला).
छापखान्यांची सोय नव्हती, विद्या गुरुमुखातून शिष्याला मिळायची आणि ऐकून, पाठ करूनच ती जपली जायची तेव्हाची ही संज्ञा. म्हणून विद्वान माणसाला बहुश्रुत’ म्हणत असतील कदाचित. […]

मध्यप्रदेश आणि मराठी अस्मिता – 1

साधारणत: असे मानले जाते की, उत्तर दिग्विजयाच्या मोहिमेवर निघालेल्या मराठी सेनेसमवेत अनेक कुटुंब बृहन्महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्थायिक झाली. महाराष्ट्राच्या सीमारेषेच्या अवतीभोवती असलेले राज्य म्हणजे मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश. बृहन्महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या लोकसंखेच्या १८ टक्क्यांपेक्षाही जास्त लोकसंख्या आहे. […]

अभियंता

मानवाची निर्मिती झाली आणि हळूहळू त्याची बुद्धी विकसीत होत गेली तसा सर्वप्रथम तो अभियंता बनला! पावसापासून संरक्षणासाठी गुहे शोधले, दगडी हत्यारे बनवली, घर्षणातून विस्तव निर्माण होतो हे जाणून गारगोट्या वापरून विस्तव निर्माण करू लागला, अन्न शिजवू लागला, […]

शक्ती संस्कारांची, आदर्शाची !

सकाळी उठताना दोन्ही हातांचे तळवे समोर ठेवून आई म्हणायला सांगायची, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती
करमूलेतु गोविंद, प्रभाते करदर्शनम् । जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी तिला नमस्कार करायचा. त्यानंतर वसुदेवसुतं देवं कंसं चाणूरमर्दनं वसुदेवसुतं देवं कंसं चाणूरमर्दनं देवकी परमानंदम् कृष्णं वंदे जगद्गुरुम् ।’ असं म्हणून उठायचं. […]

शुभं करोति

तेव्हा तिन्हीसंध्याकाळ शांत असायची. हळूहळू ज्योत मालवत जावी तसा सूर्यप्रकाश सरत चाललेल्या डोळ्यांना जाणवायचा आणि कुणा राजमंदिरातल्या दासीनं एकेका महालात एकेक दीप उजळावा तसं एकेक नक्षत्र आभाळात उजळत चालेलंही दिसायचं. दिवस उन्हाळ्याचे असतील तर सुखद आणि हिवाळ्याचे असतील तर बोचरे वारे देहाला स्पर्श करायचे. मनसोक्त मातीत खेळून आल्यावर हात-पाय धुऊन मुलं देवघरासमोर ‘शुभं करोती’ म्हणायची. […]

कैवल्यतेजाची शालीनता!

ज्ञानेश्वर माऊली म्हणजे महाराष्ट्रातल्या मातीतला एक अद्भुतरम्य चमत्कार आहे. चमत्कारंच! त्यांचं भिंत चालवणं, रेड्यामुखी वेद वदवून घेणं हे चमत्कार कुणी श्रद्धेनुसार मानावेत वा न मानावेत.. सोळाव्या वर्षी एखादी व्यक्ती गीतेवर इतकं रसोत्कट, सखोल आणि सामान्य सकळांना आपलंसं वाटणारं, जीवनोद्धार करणारं भाष्य लिहिते, अभंग रचते, अखिल विश्वासाठी पसायदान मागते, वारकरी पंथाचा पाया रचते, एकविसाव्याच वर्षी संजीवन समाधी […]

1 37 38 39 40 41 301
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..