जगातील जुनी योगशाळा – सांताक्रुझची योग इन्स्टिट्युट
सांताक्रुझ मुंबई येथील द योग इंन्स्टिट्युट ही एक फार जुनी योग संस्था आहे. तिच्यामागे सत्त्याण्णव वर्षांची परंपरा आहे. सांताक्रुझ रेल्वे स्थानकाजवळच गर्द झाडीने वेढलेल्या परिसरात या संस्थेची वास्तू उभी आहे. तिची स्थापना १९१८ साली मणी हरिभाई देसाई उर्फ योगेंद्रजी यांनी केली. सुरूवातीच्या काळात ही संस्था वर्सोवा येथील दादाभाई नौरोजी यांच्या द सॅण्डस् या बंगल्यात सुरू झाली. १९४७ साली ती सांताक्रुझ येथील सध्याच्या जागेत स्थलांतरित झाली. […]