हाल्या भुसा खातो
पोळ्याचा सन दोन दिवसावर आलता.घरात अठरा विश्व दारीद्र्य.त्यात घरातला सगळा दाळदानाबी संपला व्हता.देवालं निवदालंपण दाळ,गुळ नव्हते.पहाटं उठल्या उठल्याच बायकोनं किरकिर कराया सुरवातं केलती.“मी हाय मनुन टिकली या घरात….” हे जगातलं सगळ्यात जास्त बोललं जाणारं वाक्य तीनं पुन्हा एकदा मलं फेकुन मारलं व्हतं.. […]