साहित्यिक ठाणे – जुने आणि नवे
साहित्यिक – ठाणे आणि नवे या संबंधात मी जेव्हा विचार करू लागलो तेव्हा आदराने ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे असे श्रेष्ट साहित्यिक महाराष्ट्र सार-स्वतकार वि. ल. भावे (१८७१-१९२६) यांचेच नांव मला सर्वप्रथम आठवले. संत वाङ्मयासंबंधी त्यांनी केलेले संशोधन व त्या आधारे लिहिलेला ‘महाराष्ट्र सारस्वत’ हा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यातील एक मौलीक ठेवा आहे. […]