पुरुषपण भारी देवा
कायओ?काय चाललंय!बसले का लॅपटॉप उघडून!रविवार आहे ना?तरी सुद्धा काम?बाहेर मस्त पाऊस पडतोय..छान वातावरण आहे..चल जावू कुठंतरी!नाहीतर फिरायला..सिनेमाला नाटकाला!स्वतःहून कधी म्हणायची इच्छा होत नाहीका हो तुम्हाला?म्हटलं आज उद्या कधीतरी स्वतःहून म्हणाल..चल जावू या ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाला!पण कसलं काय!आपल्या सोसायटीतल्या सगळ्या जावून पाहून सुद्धा आल्या!त्याचं कायये कामा शिवाय काहींचं सुचत नाही ना आम्हाला!एक सांगा!आपण दोघं शेवटचं बाहेर कधी गेलो आठवत का?घरातलं करा तुमचं बघा!राब राब राबा.. सुट्टीची वाट पाहत रविवार पर्यत थांबा!पण नाही..बायकोला समजून घ्यायचंच नाही म्हटल्यावर इलाजचं खुंटला..खरंय ना? […]