नातं स्वयंपाकघराशी
वयाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे नाती बदलतात. मग ती माणसांशी जुळलेली नाती असोत, अथवा वस्तू-वास्तूंशी. प्रत्येक नात्याचा स्वतंत्र विकासक्रम असतो. नातं जन्मतं, उमलतं आणि घडत राहतं. माणूस आणि घर यांचे संबंध घनिष्ट असतात. माणूस घराला घडवतो, घर माणसाला. घर म्हणजे केवळ खांबा भिंतींवर तोललेल्या छताछपरांची इमारत नसते. माणसांना निवारा देणारं ते विश्रांतिस्थान असतं. […]