नवीन लेखन...

देशापायी सारी इसरु माया, ममता, नाती…

तिरुपतीमध्ये सध्या ‘आंध्र प्रदेश पोलीस मीट २०२१’ चे आयोजन करण्यात आलेले आहे. श्यामसुंदर हे तिरुपती पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये सर्कल इन्स्पेक्टर म्हणून तैनात आहेत. ‘ड्युटी मीट’साठी त्यांची पोलीस उपअधीक्षक मुलगी जे. सी. प्रशांती ही देखील तिथे हजर झाली. रविवारी प्रशांती समोर आल्यानंतर श्यामसुंदर यांनी आपल्या डीसीपी मुलीला ‘नमस्ते मॅडम’ म्हणत कडक सॅल्युट ठोकला. हा क्षण श्यामसुंदर यांना […]

खिल्लारी जोडी

मंडळी परवा मी सहजच फिरायला गेलो होतो सकाळी सकाळी माझ्यापुढे दोन बैल एक मालक अशी गाडी दिसली. माझ्या मनाला फार आनंद झाला आणि बैल पोळा या सणा ची आठवण झाली. […]

गळाभेट

मंडळी हा जो फोटो दिसत आहे तो फोटो आहे ज्येष्ठ कवी गीतकार जगदीश खेबुडकर यांचा. इतका मोठा माणूस कोणाला ओळखणार नाही अशी ही महान वल्ली. साहित्य क्षेत्रामध्ये वावरत असताना मोठी माणसे भेटतात. त्यांचं वर्णन करणार अवघड होऊन जाते साहित्य कला कवी गीतकार ही नाती उत्तुंग अशी मोठी असतात. परंतु अशी मोठी माणसं फार थोड्या लोकांना भेटतात यापैकी हे जगदीश खेबुडकर होय. […]

आश्वासक साहित्याची नोंद

अस्वस्थ क्षणांच्या नोंदी हा हेरंब कुलकर्णी यांचा कवितासंग्रह हाती आला. यातील अनेक कविता सोशल मीडियावर गाजलेल्या आहेत.फेसबुक वॉल वर या कविता वाचता क्षणीच यातील प्रखर सामाजिक संदर्भ साक्षात उभा राहतो.सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय भाग घेत असताना अस्वस्थ क्षणांच्या नोंदी हेरंब ने अचूक नोंदवल्या आहेत. कष्टकरी जनतेच्या प्रश्नांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेताना काही कविता नोंद केल्या आहेत. […]

मन्ना लिजा

पॅरिसमधील जगप्रसिद्ध लुव्र संग्रहालयाला रोज हजारो पर्यटक भेट देतात. १९५६ सालची गोष्ट आहे, नेहमी प्रमाणे संग्रहालयामध्ये पर्यटकांची गर्दी होती. त्यातील एका माथेफिरू पर्यटकाने जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र पाहताना आपल्या हातातील दगड दहा फुटावरील चित्राच्या दिशेने भिरकावला. तो दगड चित्राला लागून तेथील रंग खरवडला गेला. सुरक्षारक्षकांनी त्या माणसाला पकडले व त्याच्यावर रितसर कारवाई केली. लुव्र संग्रहालयाने त्यानंतर मोनालिसाच्या […]

बिस्कुट

पन्नास वर्षांपूर्वी आमच्या खेडेगावात माझ्या काकांचं किराणा मालाचं दुकान होतं. त्या दुकानात सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रीला होत्या. दुकानात सारखी येणारी गिऱ्हाईकं म्हणजे लहान मुलंच असायची. त्यांची खरेदी असायची ती गोळ्या व बिस्कीटांची! पाच, दहा पैसे देऊन हातात दिलेली बिस्कीटं घेऊन ती धूम पळायची. त्याकाळी बिस्कीटांचे मोठे पुडे मिळायचे. प्राणी, पक्ष्यांच्या आकाराची ती बिस्किटे आकर्षक दिसायची, शिवाय […]

सायकल – एक आठवण

रविवारचा दिवस होता. मुलाची सायकल रिपेअरिंग ला घेऊन गेलो. दुकानामध्ये खूपच गर्दी होती. सर्वच्या सर्व सायकल लहान मुलांच्याच रिपेअरिंगला आलेल्या. मोठी सायकल रिपेअरिंगला दिसलीच नाही. लहान्यांच्याच सायकलींची गर्दी होती. वाट पाहण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. […]

अगं बाई, अरेच्चा!

कालच्या रविवारीच गोष्ट आहे. शनिवारी माझ्या एका मित्राने अचानक आॅफिसवर येऊन माझ्याबरोबर पार्टी करण्याचा बेत बोलून दाखवला. त्याला मी शनिवार असल्यामुळे स्पष्ट नकार दिला. शेवटी फक्त जेवणाच्या बोलीवर आम्ही बाहेर पडलो. आधी त्याच्या काही वस्तू खरेदी करण्यासाठी लक्ष्मी रोडला फेरफटका मारला. त्याची खरेदी झाल्यावर एका डायनिंग हॉलमध्ये जाऊन गप्पा मारत यथेच्छ जेवण केले. जेवण झाल्यावर आम्ही […]

व्यक्तिबोधक शालेय शिक्षण

आज एक व्हाट्स अँप मेल आला, छान होता. “एक दगड काच फोडू शकतो, एक शब्द हृदय दुखावू शकतो, एक क्षणात प्रेम होऊ शकते, मग एका धड्यात परीक्षेचा पेपर का संपू शकत नाही?” थोडा विनोदी होता. लिहिणारा गमतीत लिहून गेला होता. त्याने ‘एक’ ह्या शब्दावर श्लेष साधला होता. […]

डायरी व्हाया रोजनिशी

नवीन वर्षाची सुरुवात झाली की, डायरी खरेदी करण्याची इच्छा मला होतेच. मग अप्पा बळवंत चौकात जायचं आणि अनेक दुकानाच्या काऊंटरवर मांडलेल्या डायऱ्यांवर नजर टाकायची व रविवारचं पूर्ण पान असलेली डायरी खरेदी करायची, असं कित्येक वर्ष घडलेलं आहे. नोव्हेंबरच्या शेवटी नवीन वर्षाच्या डायऱ्या बाजारात विक्रीसाठी येतात. डिसेंबर अखेरपर्यंत त्यांची किंमत जास्त असते. जानेवारी सुरु झाला की, सवलतीच्या […]

1 45 46 47 48 49 301
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..