ताकद पैशाची
पैशात मोठी शक्ती असते, ताकद असते. विविध वाक्प्रचारांतून पैशाच्या संदर्भातलं ढळढळीत सत्य ठळकपणे अधोरेखीत होतं. अठराव्या शतकापर्यंत पैसा हा प्रकार वापरात नव्हता. पैशाचा वापर न करता नगाला नग, मालाच्या बदलात माल, सेवेच्या बदल्यात सेवा, मालमत्तेच्या बदल्यात मालमत्ता अशा प्रकारची वस्तुविनिमय ही पध्दत बार्टर या नावाने प्रचलीत होती. विनिमयाच्या बार्टर पध्दतीला खूपच मर्यादा होत्या. […]