नवीन लेखन...

कौन बनेगा रोडपती…

अचानक आलेला पैसा माणसाला एक तर वर काढतो किंवा होत्याचं नव्हतं करुन टाकतो. पैसे मिळणाऱ्याकडे जर विवेकबुद्धी असेल तर तो आर्थिक नियोजन करुन पैसे कारणी लावतो. अन्यथा काही दिवसांतच तो कफल्लक होऊन जातो. हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ गीतकार राजेंद्रकृष्ण यांच्या बाबतीत असाच एक किस्सा घडलेला आहे. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांना काही लाख रुपयांची लाॅटरी लागली. त्या […]

पैसा महात्म्य

‘गिरिजाकाकू! शरदची बिल्कुल चिंता करू नका! धन, कनक,  सुलक्षणी कांता नि अखंड लक्ष्मी भरभरून वाहणारी शुभयोगाची पत्रिका आहे त्याची…’ भविष्यवेत्ते दामले गुरूजी आईला सांगत होते… […]

सेक्रेटरीच नव्हे, तर सबकुछ…!

जाहिरातीच्या व्यवसायात गेल्या पस्तीस वर्षांत अनेक नमुनेदार माणसं मला भेटली. नाटकातील, चित्रपटातील प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञासोबत एक तरी सहायक असतोच. तो सेक्रेटरी कम सबकुछ असतो. त्याला आपल्या मालकाच्या आवडी निवडी, खाणं पिणं, आर्थिक व्यवहार माहीत असतात. […]

तुझसा’ नहीं देखा..

शम्मी कपूर व अमिताचा ‘तुमसा नहीं देखा’ हा चित्रपट एकदा पाहून कधीच समाधान होत नाही.. त्यातील ‘आए है दूर से..’, ‘छुपने वाले सामने आ..’, ‘सिरपर टोपी लाल..’, ‘देखो कसम से..’ व टायटल साॅंग गाण्यांसाठी तो पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो.. नासिर हुसेन यांचं दिग्दर्शनही अप्रतिम होतं. या चित्रपटाच्या अफाट यशामुळे शम्मी कपूर व अमिताचंही सिनेसृष्टीत चौफेर नाव झालं.. […]

ताकद पैशाची

पैशात मोठी शक्ती असते, ताकद असते. विविध वाक्प्रचारांतून पैशाच्या संदर्भातलं ढळढळीत सत्य ठळकपणे अधोरेखीत होतं. अठराव्या शतकापर्यंत पैसा हा प्रकार वापरात नव्हता. पैशाचा वापर न करता नगाला नग, मालाच्या बदलात माल, सेवेच्या बदल्यात सेवा, मालमत्तेच्या बदल्यात मालमत्ता अशा प्रकारची वस्तुविनिमय ही  पध्दत बार्टर या नावाने प्रचलीत होती. विनिमयाच्या बार्टर पध्दतीला खूपच मर्यादा होत्या. […]

सक्तीचे

लहानपणी आई बाळाला जोजावते. अंगाईगीत गाते. पाळण्यात. मांडीवर झोपवते. धपाधपा पाठीवर डोक्यावर थोपटून. कारण ते लवकर झोपावे म्हणून. सक्तीने. पुढे लेकरानं चार घास जास्त खावेत म्हणून काऊ चिऊची गोष्ट. घरातील एकेका व्यक्तीचे नाव घेऊन त्याचा घास असे म्हणत खाऊ घातले जाते. […]

बाबा, होते म्हणून…

लहानपणी आमच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळले ते, बाबा होते म्हणून.. भालजी पेंढारकरांचे ‘छत्रपती शिवाजी’, ‘पावनखिंड’, ‘नेताजी पालकर’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मराठा तितुका मेळवावा’ हे चित्रपट आम्ही पाहिले. ते पाहून शिवाजी महाराजांविषयी मनात अपार आदर निर्माण झाला. अशा संस्कारमय ऐतिहासिक चित्रपटांसाठी बाबांना मानाचा त्रिवार मुजरा!! १८९८ साली भालजींचा कोल्हापूर येथे जन्म झाला. शिक्षणात मन न रमलेल्या भालजींनी […]

तुमको न भूल पायेंगे…

१९२४ साली चित्रपट सृष्टीतील एका कलंदर कलाकाराचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षी त्याने पहिला चित्रपट ‘इन्कलाब’ केला. नंतर फट्मार मारण्याच्या कामापासून त्याने चित्रपटाच्या सर्व विभागांचा अनुभव घेतला. वडील पृथ्वीराज कपूर याच क्षेत्रात नामवंत अभिनेते असल्यामुळे राजने चित्रपट निर्मितीचा देखील बारकाईने अभ्यास केला. त्याची पहिली नायिका होती, मधुबाला. १९४८ साली चित्रपट निर्माता व दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट […]

मृत्यूदिन ते दहा आकरा बारा/ तेरावं अर्थात दिवसकार्य.

कुणा घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. अकाली वयात गेल्याचं दुःख सोडलं तर खूप वय झालेल्या व्यक्तीं गेल्याचं दुःख फार काळ टिकत नाही. अर्थात आपल्या जवळच्या व्यक्तीचा कायमचा दुरावा दुःख देतच असतो. स्मशानातले सगळे विधी पार पाडतात आणि मृत शरीर अनंतात विलिन होतं. आलेली मंडळी आपापल्या घरी परततात. […]

द्वेष म्हणजे तिरस्काराची भावना

मानवी जीवन म्हणजे एक कोडेच म्हणावे लागेल. मानवी मनाचा थांग पत्ताच लागत नाही असे अनेकवेळा म्हटले जाते एव्हढेच नव्हे तर तशी प्रत्यक्ष प्रचिती देखील जीवन जगताना येते. मानवी मन हे गुणअवगुणांचा महासागर आहे. इथे चांगुलपणा आहे वाईटपणा देखील आहे. […]

1 51 52 53 54 55 304
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..