हिप्नॉटिझम
मी दी सांगली बँक लि. अंधेरी शाखेत टेलर ह्या पदावर कार्यरत होते. टेलरला पाच हजार रुपयेपर्यंतच ग्राहकाला पैसे देण्याची परवानगी होती. आमच्या बँकेत आणि प्रथम अंधेरी शाखेतच ही टेलर पद्धत सुरू झाली होती. मीही टेलरच्या पदावर नवीनच होते. त्यामुळे प्रिकॉशन म्हणून विड्रॉलचे, चेकचे आधी लेजर पोस्टिंग करून माझ्याकडे पेमेंटला येत असे. […]