नवीन लेखन...

कवितांची जन्मकथा

कोणतीही कविता निर्माण व्हायला मराठीत (किंवा इतर कुठल्या भाषेत) कोणते शब्द अस्तित्वात आहेत हा दैवाचा भाग अटळपणे नेहमी प्रकर्षाने असतो. मुख्यत्वे संस्कृत आणि फारसी/अरबी/उर्दू शब्द जसेच्या तसे किंवा अपभ्रष्ट रूपांमधे अवतरून सध्याच्या मराठी भाषेतले शब्दभांडार तयार झाले आहे. केवळ एक उदाहरण म्हणून मी ग. दि.माडगूळकरांचे खालचे सुंदर गीत उद्धृत करत आहे. […]

कोकणभूमीतील औषध निर्मिती आणि आयुर्वेद विकास

येवा कोकण आपलाच आसा ही टॅगलाईन सांगणारी आमची सिंधुसंस्कृती ! शब्द स्पर्श रूप रस आणि गंध यांची अनुभूती देत मन आत्मा आणि इंद्रियाना सुखावून टाकणारी इथली लाल माती…. इथेच दिसेल,कोणत्याही संकटांचा सहजपणे सामना करण्यासाठी  आवश्यक असलेली निधडी छाती… आणि मना मनाने जोडून ठेवलेली कोकणची नाती… […]

श्रेय…

का फार मोठ्या कंपनीचे उदघाटन आहे म्हणून जय्यत तयारी झाली होती. कंपनीचे नाव श्रेय. कंपनीच्या सर्व मजुरांना आणि सहकारी लोकांना आमंत्रित केले होते. कंपनी सुरू होऊन बरेच दिवस झाले होते पण मग आता उदघाटन कसे कोण करणार आहेत हे कळले नाही. पण सगळेच उत्साहाने काम करत होते. […]

चयनम

समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साहित्य अकादमीने विभिन्न भारतीय भाषेतील निवडक साहित्य “चयनम “ नावाने नुकतेच प्रकाशित केले आहे. समकालीन भारतीय साहित्य पत्रिकेचे संपादक व हिंदी साहित्यिक श्री अरुण प्रकाश यांनी “चयनम “ चे संपादन केले आहे. साहित्य अकादमीच्या सुवर्ण जयंती वर्षा निमित्त ही योजना अस्तित्वात आली आहे. […]

‘वेलकम टू कोंकण’

निसर्गरम्य, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जो कोकणाला लाभलेला आहे, तो वारसा कायमस्वरूपी जपण्यासाठी स्थानिक लोक, सरकार तसेच पर्यटन व्यावसायिक ह्या सर्वांनी एकत्र येऊन कोकणासाठी पर्यटन टिकविण्याच्या दृष्टिकोनातून काम केले पाहिजे. […]

तेंव्हा पासून….

खाद्या प्रसंग माणसाला बरेच काही शिकवून जातो. पण आठवण मात्र कायम राहते. आणि एक धडा शिकायला मिळतो. माझ्या बाबतीतही असेच झाले आहे. मुलं लहान असताना दरवर्षी पास झाले की पेढे आणून देवापुढे ठेवून मग सगळ्यांना वाटत होते आणि त्यांचे कौतुक करत होते. […]

कोकण, नारळ आणि कोकम

कोकण म्हणजे एक अंगठी मानली तर त्यात कोकम म्हणजे माणिक, पाचू म्हणजे हिरवागार निसर्ग आणि नारळ म्हणजे गोमेद अशी तीन रत्न त्यावर जडली आहेत असं म्हणायला हरकत नाही. आहे त्यात भागवण्यापेक्षा जे आहे त्यात साजरं कसं करता येईल असा स्वभाव असणाऱ्या कोकणी माणसाकडे आदरातिथ्य यथायोग्य होतंच. […]

बाईपण..

बाईपण म्हणजे काय हे बाईला समजले पाहिजे. पुरुषांना आपला पुरुषार्थ गाजवावा लागतो. अगदी तसेच बाईला बाईपण निभावून न्यायला लागते. म्हणजे किमान नम्रता. शालीनता. चारित्र्य. त्याग.संयम.सुगरण.स्वच्छता टापटीप. अशा अनेक गोष्टी असतात. शिवाय माया प्रेम आपुलकी. बांधिलकी निष्ठा यादी खूप मोठी आहे आणि हे सगळे अगदी काटेकोरपणे पाळणे शक्य नसेल तर किमान थोडे बहुत असणे आवश्यक आहे नव्हे […]

मुंबई मेरी जान…

खरं पाहता मुंबई ही काम करणाऱ्याची आईच आहे. कारण मुंबई कधीच कुणाला नाराज करत नाही. देशभरातून लोक इथे येतात आणि पैसे कमावतात. आता तर मुंबईची लोकसंख्या प्रचंड वाढलेली असल्यामुळे येथे ग्राहकही खूप आहेत. अगदी 20 – 25 वर्षांपूर्वी जिथे कमी लोकसंख्या होती, तिथे मोठमोठे टॉवर्स उभे राहिलेले आहेत. कोरोनाकाळाचं जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर नोकरी गेल्यामुळे त्रासलेल्या लोकांना नव-रोजगार सुद्धा मिळालेला आहे. […]

‘होडी’ – विजनवासातील वल्हवणे !

गजेंद्र अहिरे हा माणूस आरपार क्लिष्ट आहे. भावनांचे जंगल तयार करायचे, त्यांत प्रेक्षकांना सोडायचे आणि हळूच हातातून हात काढून घ्यायचा. मग तुम्ही वल्हवत बसा होडी- नशिबी असेल तर मिळेल किनारा अन्यथा आहेच चारही बाजूला पाणी- नाकातोंडात जाऊन गुदमरायला लावणारे. […]

1 57 58 59 60 61 301
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..