कवडीची किंमत
कवडी (संस्कृत: कपर्दिका; इंग्रजी: Cowry) हे समुद्रात सापडणारे, एका प्रकारच्या गोगलगाईचे कवच आहे. याचा वापर नाण्याचा शोध लागण्यापूर्वी चलन म्हणून होत असे. तसेच सारीपाट, चौसर इत्यादी खेळांमधे याचा वापर डाव टाकण्यास करण्यात येत असे. साधू-बैरागी-वासुदेव कवडीच्या माळा गळ्यात घालतात. गाई, बैल, घोडे, म्हशी इत्यादींच्या सुशोभनासाठी कवडयांचा वापर करण्यात येतो. जुन्या काळी कवडीचा उपयोग नाणे म्हणून करीत […]