रंगमहर्षी एम. आर. आचरेकर…
१९५१ साली राज कपूरचा ‘आवारा’ प्रदर्शित झाला. त्यातील ‘घर आया, मेरा परदेसी..’ या स्वप्नगीताला रसिकांनी डोक्यावर घेतले. त्या गाण्यासाठी मोठमोठ्या मूर्ती, मनोरे, मुखवटे, एलिफंटा येथील त्रिमूर्तीचे सेट्स उभे केले होते. कृत्रिम धुराच्या सहाय्याने सेटवर स्वर्गीय वातावरण निर्मिती केलेली होती. जेव्हा हे गाणं संपतं तेव्हा त्या मूर्तीं पडतात असे दाखविले होते. हे कलादिग्दर्शन केलं होतं, राजकपूरचे सर्वाधिक चित्रपटांचे कलादिग्दर्शन करणारे महाराष्ट्राचे महान चित्रकार मुरलीधर रामचंद्र आचरेकर यांनी! […]