पं हेमंत पेंडसे (अभिषेकी) षष्ठ्यब्दि !
हेमंत पेंडसेंना “अभिषेकी” हे आडनांव दस्तुरखुद्द शौनक अभिषेकींनी काल बहाल केलं. त्याआधी विद्याताई अभिषेकी पडद्यावरील क्लिप मधून म्हणाल्या- “यांचा (अभिषेकी बुवांचा) भास होतो, हेमंतच्या गायकीत”. […]
हेमंत पेंडसेंना “अभिषेकी” हे आडनांव दस्तुरखुद्द शौनक अभिषेकींनी काल बहाल केलं. त्याआधी विद्याताई अभिषेकी पडद्यावरील क्लिप मधून म्हणाल्या- “यांचा (अभिषेकी बुवांचा) भास होतो, हेमंतच्या गायकीत”. […]
त्या बारा वर्षांच्या गीताचे वडील म्हणजेच ज्येष्ठ चित्रकार व कलागुरू सावळाराम लक्ष्मण हळदणकर! १९२९ साली काढलेले ते ‘ग्लो आॅफ होप’ हे चित्र आज म्हैसूर येथील जगमोहन पॅलेस मधील जयचमा राजेंद्र आर्ट गॅलरीत पहायला मिळते. हळदणकरांना हे चित्र काढण्यासाठी, गीताला रोज तीन तास असे तीन दिवस समई हातात धरुन त्या पोजमध्ये उभे करावे लागले होते. या चित्राचे एक दुर्दैव असे आहे की, कित्येकजण या चित्राचे श्रेय राजा रविवर्माला देतात, जे चुकीचं आहे. […]
एक काळ होता… जेव्हा दुरदर्शनवर ब्लॅक ऍन्ड व्हाईट टिव्हीवर सायंकाळी साडेसात वाजता दिल्या जाणाऱ्या बातम्याही मोठ्या औत्स्युक्याने आणि विश्वासाने घराघरातून पाहिल्या जायच्या.. त्यावरच्या बातमीदारांना नावानिशी पक्के ओळखले जायचे.. त्यांची प्रत्येकाची ढब, शैलीचे कौतुक आणि अनुकरण केले जायचे.. मग त्या भक्ती बर्वे-इनामदार असोत वा रंजना पेठे… प्रदीप भिडे, अनंत भावे असोत वा विनायक देशपांडे… या सर्वांच्या बातम्या लक्षपुर्वक ऐकल्या जायच्या… […]
ग्रामीण भागामध्ये पुष्कळ लिहिण्यासारखे असते बारीक-सारीक गोष्टी या गोष्टीला अतिशय महत्त्व साहित्यामध्ये निर्माण झालेले असते. पूर्वी याच माझ्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची फार गैरसोय होती नरसोबाच्या वाटेला. सुबराव आण्णा यांची एक विहीर व आनंदा खोत यांची एक विहीर या दोन विहिरी उन्हाळी पावसाळी पाण्याने भरलेल्या असायच्या. परंतु या गावच्या आडाला आडला सुद्धा पाणी भरपूर असायचे. […]
माझा अत्यंत लाडका मित्र, प्रचंड कष्ट घेत घेत जेव्हा एक प्रतिभा संपन्न अभिनेता म्हणून मला मोठ्या पडद्यावर दिसला, तेव्हा त्याचा खूप अभिमान वाटणारी मैत्रीण म्हणून मला त्याला हे पत्र लिहावंसं वाटलं…आपल्या माणसांचं कौतुक करण्याची संधी कधीच सोडू नये असं मला नेहमी वाटतं..आपल्याला त्यांच्या बद्दल काय वाटतंय हे नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवावं..’व्हिक्टोरिया’ हा मराठीतील एक दर्जेदार भयपट अलिकडे […]
रायपूरला असताना माझ्या सहकाऱ्यांसमवेत “अमरकंटक ” येथील नर्मदेचा उगम मी पाहिला आहे पण मला व्यक्तिशः नर्मदा परिक्रमा करावी असे वाटत नाही. बसने नाही आणि कोणाबरोबरही नाही. एकट्याने बघू, कधी जमलीच तर ! तोवर हे पुस्तक आहेच की नर्मदास्नानाची अनुभूती देणारे ! […]
एमेलियाने दोन हजार सव्वीस मैलांचा अॅटलांटिकचा विमानोड्डाणाचा प्रवास फक्त चौदा तासांत केला होता. या चौदा तासांत झोप वा डुलकी लागू नये म्हणून तिने ‘स्मेलिंग सॉल्टचा वापर केला होता. तसेच खाद्यपदार्थांच्या तिने टोमॅटो सूप म्हणून सेवनामुळे सुस्ती येऊ नये म्हणून वा झोप येऊ नये थर्मासमधून व डब्यामधून सोबत नेले होते. […]
आभाळ भरून आलं. कोणत्याही क्षणी तो कोसळेल असे वातावरण. सगळीकडे काळोख दाटला. अधून मधून वादळाची चाहूल. आणि मंदाताई बेडवर टेकून बसून बघत होत्या. हेडफोन लावून गाणी ऐकत होत्या. का रे दुरावा. का रे अबोला. आणि मागील सगळेच आठवायला लागले. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions