ललित लेखन
वानप्रस्थाश्रमातील मूलभूत विचार
आतापर्यंत आपण पैसा, पैसा आणि पैसा हाच आपला सखा, मित्र, गणगोत समजत होतो. त्याऐवजी सखा भगवंत झाल्याने उद्वेग, चिंता, काळजी नष्ट होऊन त्याऐवजी आता मानसिक समाधानाची प्राप्ती आपल्याला होते आहे. त्यामुळे सर्व प्रापंचिक, भौतिक वस्तुंवरील आपली आसक्ती सहजपणे कमी होते आहे. हे आत्मपरीक्षण, त्यातून प्राप्त झालेली अनुभूती हीच आपल्याला जीवनाचे अंतिम प्राप्तव्य म्हणजे कृतकृत्यतेकडे घेऊन जाईल. […]
जगण्याला प्रयोजन हवे
एक मोठे ध्येय डोळ्यासमोर होते. त्या ध्येयाने मला जिवंत ठेवले. त्या ध्येयाने मला तेथील छळ सोसायला बळ दिले. ज्याला जीवनाचे ध्येय मिळाले आहे, तो कोणतेही आघात सोसू शकतो, कोणतीही संकटे झेलू शकतो आणि कोणतेही दिव्य पार करू शकतो. फक्त मनुष्याला ध्येय हवे.
जगण्याला प्रयोजन हवे.
[…]
खडू नव्हे, दीपस्तंभ
दरवर्षी प्रमाणे आज म. द. वारे सरांना भेटायला मी त्यांच्या सहकार नगरमधील ‘स्नेहल’ बंगल्यावर गेलो. पहातो तो काय बंगल्याच्या फाटकाला कुलूप. शेजारची बेल वाजविल्यावर एकाने फाटक उघडले. वरती सरांच्या खोलीत जाऊन बसलो. दहा मिनिटांनी सर आले.
वर्षातून या दिवशीच मी सरांना भेटत असल्यामुळे, मधल्या कालावधीत न भेटल्याची मला खंत वाटत होती. […]
ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे
‘ज्येष्ठ म्हणजेच श्रेष्ठ आणि श्रेष्ठत्व असलेला प्रत्येक जण ज्येष्ठ’ असं मी मानते. आज अनेक वर्षे कला क्षेत्रात काम करीत असताना नव्या आणि जुन्या पिढीतील प्रत्येक कलाकारांकडून अनेक गोष्टी नकळतपणे शिकायला मिळतात. […]
घरानंतरचं बाहेरचं जेवण..
फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, आदरणीय वसंत वाघ सरांचा मला महिन्यातून एकदा तरी फोन येतो, ‘गुडमाॅर्निंग सुरेशराव, मी डेक्कनला येतोय. पंधरा मिनिटांत ‘गुडलक’ला या.’ मी लगेचच निघतो. भिडे पुलावरुन पलीकडे गेलं की, दहाव्या मिनिटाला मी गुडलकला पोहोचतो. रिक्षा कडेला घेऊन सर उतरतात. आम्ही दोघे गुडलकमध्ये पलीकडील पॅसेजमधील एक टेबल पटकावतो. वेटरला दोन चहाची आॅर्डर दिल्यानंतर सर बोलू लागतात… […]
आवाज की दुनिया
माणूस जन्माला आल्यापासून तो आवाजाशी जोडला जातो. आवाज आहे, तर कुणाचं तरी अस्तित्व सोबत आहे हे समजून येतं. अगदी पहिला आवाज तो ऐकतो स्वतःच्याच रडण्याचा. मग त्याला ऐकू येते का? ते पहाण्यासाठी खुळखुळा सारखी खेळणी घरात आणली जातात. कुणी पाळण्याजवळ येऊन ते वाजवलं की, ते बाळ त्या दिशेला नजर वळवतं. […]
एव्हरग्रीन चंद्रशेखर
मी देव आनंदचा जबरदस्त फॅन आहे. लहानपणापासून मी त्यांचे चित्रपट पहात मोठा झालो. त्याचे ब्लॅक अॅण्ड व्हाईट पासून सप्तरंगी चित्रपटही पाहिले, साठवणीतल्या आठवणीत ते जपून ठेवले. […]
एक तीळ नऊ जणात…
आमच्या वेळी, म्हणजेच पन्नास वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांविषयी तळमळ असणारे शिक्षक होते. त्याच्याही आधी पु. लं. चे चितळे मास्तर होते. ज्यांनी ‘विद्यादान’ हेच आपलं ध्येय आयुष्यभरासाठी जपलं. मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात कसंबसं भागवत आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं सोनं केलं. […]
आत्मनिर्भरता
परदेशात मुलांनी सेटल होणं, कायमचं अंतरणं या गोष्टी महाराष्ट्रातील आई-वडिलांना नवीन नाहीत. चावून चोथा झालेले हे विषय आहेत आणि तरीही पुन्हा पुन्हा कोणाच्या तरी बाबतीत किंवा कधी कधी आपल्याच बाबतीत येणारा हा अनुभव आहे. […]