पोचपावती
चार दिवसांपूर्वी मी आॅफिसला पोहचल्यावर मोबाईल पाहिला, तर एक ‘मिस्ड काॅल’ येऊन गेला होता. मी तो नंबर लावल्यानंतर मला पलिकडून एका वयस्कर स्त्रीचा आवाज आला, ‘तुम्ही नावडकरच बोलताय ना?’ मी होकार दिल्यावर त्या मावशी पुढे बोलू लागल्या, ‘मी सुधा बोलतेय, मला तुम्ही व्हॅलेंटाईनवर लिहिलेलली कविता फार आवडली. ‘मी त्यांना समजावून सांगितले की, ती कविता नसून कथा […]